Home युवा मराठा विशेष गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नम: सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्या

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नम: सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्या

32
0

आशाताई बच्छाव

20220713_105032-BlendCollage.jpg

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः,
गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नम:

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्या

वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन,म ग्रंथपूजन नाही तर तत्वांच पूजन आहे, तत्वांच पालन आहे. गुरु कोण असतो, तर आपल्या पेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था! मग गुरु म्हणजे एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.

गुरूकडून आपण विद्या, ज्ञान प्राप्त करतो. म्हणजेच इथे आदान-प्रदान आहे, ते ज्ञानाचे, विद्येचे! गुरूकडून ज्ञान प्राप्त करायचे, गुरू म्हणजे आत्मदर्शन, गुरू म्हणजे आत्मपरीक्षण आपल्या समाजात! म्हणून गुरुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश असे आद्य स्थान प्राप्त आहे.
जयाने जन्म देऊन आणिले या धरणी🙏
बालपणी हाताला धरून चालवायला शिकवणारी आपली आई, ज्यांचे अनुकरण करून आपण व्यवहार , कुटूंब वत्सल बनतो ते वडील,लहानपणी चुक भुल स्वीकारून समाजात दिशा दाखविणारे कुटुंबातील वडीलधारी, शाळेत काय बरोबर काय चूक हे अगदी मुलांना आत्मसात होई पर्यंत शिकवणारे गुरुजी. याना साष्टांग प्रमाण👏
त्याचप्रमाणे कामात,व्यवसायात, व्यापारात असल्या अनेक ठिकाणी मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींचे, वरिष्ठांचे सुद्धा आभार ज्यांनी जीवनाच्या या प्रवासात,संघर्षात प्रत्येक ठिकाणीं ,प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आपल्या आलेल्या अडीअडचणींची माहिती देऊन नेहमी आपला पाठपुरावा केला.

साधारणतःया 2022 च्या वर्षात पत्रकारिता करण्यात माझे पदार्पण झाले. इच्छा तर होतीच पण मला कधी वाटलं नव्हतं की मी खरंच पत्रकार होईल माझ्या एका मित्राच्या वतीने आदरणीय राजेंद्र पाटील राऊत साहेब यांचा फोनवर परिचय झाला नंतर त्यांनी मला या प्रवाहात आणले आणि आज मी एक छोटासा पत्रकार म्हणून कार्यरत आहे समाजात प्रत्येक ठिकाणी पत्रकार म्हणून संबोधण्याचा दर्जा मिळाला केवळ त्यांच्यामुळेच !!राजेंद्र पाटील राऊत साहेब यांनी मला पत्रकारिता कशी करावी,काय कौष्यल्य असावे,भाषा शैली कशी असावी,आपला लोकांशी संपर्क कसा असावा याची जाणीव सुद्धा करून दिली.सुरवातीला अडचणी आल्याच,बातमी काय असते,ती कशी तयार करावी.वाक्य रचना कशी करावी या बाबत साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.अनेक छोट्या मोठ्या चुका लक्षात आणून दिल्या.युवा मराठा न्यूज नेटवर्क मध्ये काम करतांना अनेक अडचणी आल्या.पत्रकारितेत काम करताना मला धमक्या शिवी गाळ करणे,असे अनेक प्रकार केले गेले,पण साहेबांनी खंभिर पने मला साथ दिली त्यामुळे माझे कोणीही काही करू शकले नाही
त्यामुळे आज मी त्यांचा खुप आभारी आहे.👏

आमचे साहेब मूळचे राहणारे मालेगाव तालुक्यातील कवलाने गावचे.तेथून त्यांनी हा प्रवास सुरू केला.बालपणात आईचे छत हरवले.जबाबदारी वाढली आणि सगळा प्रापंचिक गाडा सांभाळत साहेबांनी युवा मराठा चे जाडे पूर्ण देशभर पसरविले आज जवळपास 80/85 प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क मध्ये तयार झाले आहेत.
युवा मराठा न्यूज नेटवर्क मध्ये साहेबांनी सगळ्यांना संधी मिळावी म्हणून कोणतेही अट घातली नाही.सगळ्यांना परवडेल अशी माफक फी,आयडी कार्ड व शक्य तितके सवलती दिल्या आहेत.
अशा या अडीअडचणीला सामोरे जाणाऱ्या,नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या या महान योध्यास आज या गुरुपौर्णिमेला माझा शतश:प्रणाम.👏

युवा मराठा न्यूज,वेब पोर्टल
रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here