Home नांदेड बा-हाळी नजीक असलेल्या पूलावरुन कूंन्द्राळा नदीच्या पूराचे पाणी . बा-हाळी –देगलूर मार्गावरील...

बा-हाळी नजीक असलेल्या पूलावरुन कूंन्द्राळा नदीच्या पूराचे पाणी . बा-हाळी –देगलूर मार्गावरील वाहतूक ठप्प.

135

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0018.jpg

बा-हाळी नजीक असलेल्या पूलावरुन कूंन्द्राळा नदीच्या
पूराचे पाणी . बा-हाळी –देगलूर मार्गावरील वाहतूक ठप्प.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बा-हाळी-
गेल्या आठ दिवसापासून बा-हाळी परीसरात पडत असलेल्या पावसाने आता नदी नाले ओसंडून वाहत असून छोट्या मोठ्या नद्यांना पूर येत आहे.बा-हाळी नजीक असलेल्या पूलावरुन कूंन्द्राळा नदीचे पाणी वाहत असल्याने आज सकाळ पासून जवळपास। १० ते १५ गावांचा बा-हाळीशी असणारा संपर्क तुटला आहे.
परीसरात गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार सूरु आहे. लहान मोठ्या नदी नाल्यांना आता पूर येण्यास सुरुवात झाली आहे ,कूंन्द्राळा नदी त पाणी वेगाने वाढत असल्याने बा-हाळी देगलूर मार्गावरील पूलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कबनूर,माकणी,वसूर,सकनूर,बिल्लाळी,जाहूर,येवती,देगलूर सह अनेक वाडी तांड्यांचा बा-हाळीशी असणारा संपर्क तूटला आहे.
गेल्या वर्षी महापुराणे सदरील पूलावरील डांबरी व सिमेंट रस्ताच वाहून गेला होता .अनेकांनी नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती पण त्या कडे दूर्लक्ष करीत मूरुम टाकून वाहतूक सूरळीत केली होती.
वाहनचालकांनी तथा प्रवाशांनी पूराचे पाणी ओसरल्यावरच सूरक्षीत पणे पूढील प्रवास करावा, शेतकऱ्यांनी आपले पाळीव जनावरे नदीच्या काठावर बांधणे टाळण्याचे आवाहन मूक्रमाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी केले आहे.

Previous articleयुवा मराठाचे मुख्य संपादक पाटील /राऊत महान गुरू आमचा आदर्श ..!!
Next articleगुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नम: सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.