Home जळगाव यावलचे तहसीलदार व सहकाऱ्यांनी अंजाळेजवळ नदीकाठी साठवलेली वाळू केली जप्त

यावलचे तहसीलदार व सहकाऱ्यांनी अंजाळेजवळ नदीकाठी साठवलेली वाळू केली जप्त

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20231006-WA0032.jpg

यावलचे तहसीलदार व सहकाऱ्यांनी अंजाळेजवळ
नदीकाठी साठवलेली वाळू केली जप्त

योगेश पाटील, जळगांव.

जळगांव :- यावल तालुक्यातील अंजाळे येथील तापी नदीच्या काठी विविध ठिकाणी ठिकाणी अवैद्यरित्या साठवण करून ठेवण्यात आलेला सुमारे १०० ब्रासहून अधिकचा गौण खनिजचा साठा जप्त करण्यात आला आहे. बेवारसरित्या चोरीच्या उद्देशाने साठवण करून ठेवलेला दगड गोटे आणि डबरचा हा साठा तहसीलदारांच्या पथकाने हस्तगत केला आहे. तेव्हा या डबरच्या साठ्याचा प्रशासकीय पातळीवरील कारवाई पूर्ण करून लिलाव देखील केला जाणार आहे. तर या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन आणि साठा करणाऱ्यांमध्ये खळबड उडाली आहे.
अंजाळे ता. यावल या गावाजवळील तापी नदीच्या काठी गट क्रमांक ५८८, गट क्रमांक ५६४/१ आणि ५५२ मध्ये अवैद्यरित्या दगड गोटे डबर अर्थात गौण खनिज अवैद्यपणे साठवून ठेवले होते. या बाबतची गोपनीय माहिती तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांना मिळाली होती. तेव्हा त्यांनी या ठिकाणी जावून छापा टाकला असता तेथे सुमारे १०० ब्रास होऊन अधिकचा
अवैद्य गौणखनिजचा साठा मिळून आला. तेव्हा सदरील गौणखनिजसाठा बेवारस म्हणून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकर सह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळ अधिकारी सचिन जगताप, मीना तडवी, बबीता चौधरी, तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी, टी.सी. बारेला, तेजस पाटील, अरविंद बोरसे या पथकाने केली. आता प्रशासकीय पातळीवरील कारवाई पूर्ण करून या संपूर्ण अवैद्य गौण खनिज साठ्याचा लिलाव प्रशासनाच्यावतीने केला जाणार आहे. तेव्हा तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे यावल तालुक्यात अवैद्य गौण खनिज उत्खनन आणि साठवण करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleजमीनधारकांनी मोबदला स्वीकारुन जमिनीचा ताबा द्यावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
Next articleमाजी महापौर ललित कोल्हे यांचे वडील, तसेच माजी नगर सेवक, समाजसेवक विजयराव (बापूसाहेब) यांचे दीर्घ आजाराने निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here