Home जळगाव माजी महापौर ललित कोल्हे यांचे वडील, तसेच माजी नगर सेवक, समाजसेवक विजयराव...

माजी महापौर ललित कोल्हे यांचे वडील, तसेच माजी नगर सेवक, समाजसेवक विजयराव (बापूसाहेब) यांचे दीर्घ आजाराने निधन

110

आशाताई बच्छाव

IMG-20231006-WA0027.jpg

माजी महापौर ललित कोल्हे यांचे वडील, तसेच माजी नगर सेवक, समाजसेवक विजयराव (बापूसाहेब) यांचे दीर्घ आजाराने निधन

योगेश पाटील, जळगांव.

जळगाव शहराचे माजी नगरसेवक विजयराव (बापूसाहेब) कोल्हे वय – ७० यांचे गुरुवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते माजी महापौर ललित कोल्हे यांचे वडील तर शिवसेना महिला जिल्हाअध्यक्षा सरिता माळी कोल्हे यांचे सासरे होते. त्यांची अंतयात्रा आज दुपारी १ वाजता राहत्या घरून निघेल.
स्वातंत्र्यसैनिक पंडितराव कोल्हे यांचे चिरंजीव असणाऱ्या विजयबापूंनी त्यांचा समाजसेवेचा वारसा समर्थपणे चालविला. ऐशीच्या दशकात तत्कालीन जळगाव नगर पालिकेपासून आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या विजयबापूंनी सातत्याने जवळपास ३५ ते ४० वर्षे नगरसेवकपद भूषविले. त्यांच्या सौभग्यावती सिंधूताई कोल्हे यांना नगराध्यक्षपद तर चिरंजीव ललीतभाऊ यांना महापौरपदाची संधी देखील मिळाली. विजय बापू यांच्या निधनामुळे समाजातील सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleयावलचे तहसीलदार व सहकाऱ्यांनी अंजाळेजवळ नदीकाठी साठवलेली वाळू केली जप्त
Next articleजळगावकर ‘ऑक्टोबर हिट’ने हैराण; उकाड्यातून कधी मिळणार दिलासा?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.