Home जळगाव चाळीसगावात कॅफेमध्ये मुला-मुलींचे आक्षेपार्ह कृत्य कॅफेचालकाच्या विरोधात गुन्हा

चाळीसगावात कॅफेमध्ये मुला-मुलींचे आक्षेपार्ह कृत्य कॅफेचालकाच्या विरोधात गुन्हा

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20231110_175222.jpg

चाळीसगावात कॅफेमध्ये मुला-मुलींचे आक्षेपार्ह कृत्य
कॅफेचालकाच्या विरोधात गुन्हा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – शहरातील हिरापूर रेाडवरील महाविद्यालयासमोरील कॅफेमध्ये अधिक पैसे आकारून कॉफी देण्याच्या निमीत्ताने अधिक पैसे आकारून जागा उपलब्ध करून देवून अशा जागेत आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्यास परवानगी दिल्याचा भयंकर प्रकार चाळीसगाव शहर पोलीसांनी उघडकीस आणला आहे.याप्रकरणी तेथे आढळून आलेल्या मुला-मुलींना यापुढे असे कृत्य न करण्याबाबत समज देत सोडून दिले. तर कॅफे चालकाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीसांनी केलेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,येथील हिरापूर रस्त्यावरील राष्ट्रीय विद्यालयासमोरील नगरपालीकेच्या व्यापारी संकुलात यु.एस. कॅफेमध्ये परिसरातील शाळा, कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुण-तरुणी यांना कॉफी देण्याच्या निमीत्ताने कॅफेमध्ये मालक अधिक पैसे आकारून खाजगी जागा उपलब्ध करून देतो व या खाजगी जागेत आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्यास परवानगी दिली जाते अशी गुप्त माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. या बाबींमुळे परिसरातील नागरीकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी मिळाली. त्यानुसार जावून खात्री करा असे निर्देश पोलीस निरीक्षकांनी पोलीसांना दिले असता पोना. भूषण पाटील, पोकॉ. पवन पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे,रविंद्र बच्छे, विजय पाटील, मपोकॉ सबा शेख यांच्या पथकाने गुरूवार दि.9 रोजी दुपारी 2.30 वाजता या कॅफेमध्ये जावून कॅफेची झडती घेतली असता एका खोलीत काही मुले व मुली बसलेली व आक्षेपार्ह वर्तन करतांना दिसून आली.पथकाने या मुला-मुलींना पुन्हा असे कृत्य न करण्याबाबत समज दिली.
याप्रकरणी कॅफेचालक उमाकांत दिलीप सोनार रा. जयबाबाजी चौक, चाळीसगाव याच्या विरोधात शाळा-कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी, परिसरातील तरुण तरुणी यांना कॉफी देण्याच्या निमीत्ताने अधिक पैसे आकारून कॅफेमध्ये जागा उपलब्ध करून देत अशा जागेत आक्षेपार्ह व अभ्य कृत्य करण्यास परवानगी दिली. त्यामुळे परिसरातील नागरीकांना त्याचा त्रास होवून उपद्रव होतो म्हणून पोकॉ. पवन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 290 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleचिखलपहेला येथे 15 नोव्हेंबरला सौदा जन्मदात्याचा या नाटकाचे आयोजन
Next articleबिलाखेड येथे बंद घर फोडून 60 हजारांचा ऐवज लंपास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here