Home जळगाव बिलाखेड येथे बंद घर फोडून 60 हजारांचा ऐवज लंपास

बिलाखेड येथे बंद घर फोडून 60 हजारांचा ऐवज लंपास

204

आशाताई बच्छाव

IMG_20231110_175706.jpg

बिलाखेड येथे बंद घर फोडून 60 हजारांचा ऐवज लंपास
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – तालुक्यातील बिलाखेड येथे घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकरमधून रोख रकमेसह सोन्याचे दागिणे व मोबाईल असा सुमारे 60 हजाराचा ऐवज लंपास केला. दिवाळीनिमीत्त हे कुटुंब मूळ गावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. तसेच शेजारच्या घरातून मोबाईल देखील चोरून नेला.याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन निंबा चव्हाण रा. उत्कर्ष गोडावूनच्या पाठीमागे, बिलाखेड यांचे बि-बियाणे विक्रीचे दुकान आहे.दि. 8 नोव्हेंबर रोजी ते सकाळी 8 वाजता कुटुंबासह बेलगंगा येथे दिवाळीनिमीत्त आई वडिलांकडे गेले होते.दि.9 रोजी सकाळी 8.30 वाजता ते बिलाखेड येथील घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला व हॉलमधील सामान अस्तव्यस्त दिसले.तर घरातील कपाटातील लॉकरही तुटलेले दिसले.
चोरट्यांनी दि.8 रोजी सकाळी 8 ते दि.9 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 48 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, 2 हजार रूपये किमतीच्या दोन नथ, 1 हजार रूपये किंमतीचे ओम पान व रोख 5 हजार रूपये असा 56 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. तसेच चव्हाण यांच्या घराशेजारी राहणारे कारभारी ज्ञानदेव सुर्यवंशी यांचा 4 हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. चोरट्यांनी एकुण 60 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी चेतन निंबा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादंवि कलम454,457,380,379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleचाळीसगावात कॅफेमध्ये मुला-मुलींचे आक्षेपार्ह कृत्य कॅफेचालकाच्या विरोधात गुन्हा
Next articleपहेला येथे मंडई निमित्त 21 नोव्हेंबरला व्यथा दोन पाखरांची या नाटकाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.