Home नांदेड जमियत उलमा ए हिंद च्या बिलोली तालुकाध्यक्षपदी हाफीज मो.अब्दुल्ला यांची निवड

जमियत उलमा ए हिंद च्या बिलोली तालुकाध्यक्षपदी हाफीज मो.अब्दुल्ला यांची निवड

101
0

राजेंद्र पाटील राऊत

जमियत उलमा ए हिंद च्या बिलोली तालुकाध्यक्षपदी हाफीज मो.अब्दुल्ला यांची निवड

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

बिलोली तालुक्यातील मौजे कार्ला येथील मस्जिद ए जब्बार निलोफर खान येथे दि.५ फेब्रु.रोजी पार पडलेल्या जमियत उलमा-ए- हिंद (अर्शद मदनी ग्रुप) च्या वतीने कौमी एकता हा कार्यक्रम पार पडला असून यात नुकतेच हाफीज मोहम्मद अब्दुल्ला यांची जमियत उलमा ए हिंद च्या बिलोली तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

हि निवड जमियत उलमा ए हिंद नांदेड जिल्हा सेक्रेटरी मोहम्मद आयुब खासमी यांच्या अध्यक्षतेखाली व हाफीज खलील अहमद,मौलाना.अब्दुल लतीफ,कासमी हाफीज शहजाद,हाफीज फयाज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

हाफीज मोहम्मद अब्दुल्ला हे मुस्लिम समाजाच्या  सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असून समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हाफीज मोहम्मद अब्दुल्ला यांची जमियत उलमा ए हिंद च्या बिलोली तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यासोबतच जमियत उलमा ए हिंद या सामाजिक संघटनेची पुढील कार्यकारिणी घोषित करत बिलोली तालुका उपाध्याक्षपदी हाफीज मन्सूर उल हसन, शेख युसुफ अली सय्यदसाहब,मोमीन आखिल,सय्यद मतीन यांची निवड करण्यात आली तर जनरल सेक्रेटरीपदी अख्तर खासीम,हाफीज इसाख,शेख जहीर मौला,शेख अबरार अयुब पटेल तर जॉइन्ट सेक्रेटरीपदी मिर्झा अहसान आरिफ बेग,सिराज अकबर बेग व कॅशिअर म्हणून इरफान बेग महेबुब बेग मोगल व सदस्य पदी शेख अहमद हसनसाब,शेख खय्युम आदींची निवड करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

जमियत उलमा ए हिंद ही संघटना गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत या सामाजिक संघटनेच्यावतीने तब्बल ३ हजार प्राथमिक शाळा व १७०० कार्यालय असून यामध्ये दरवर्षी शंभर मुलांना IIT व NEET या शिक्षणासाठी मोफत शिक्षण दिले जात आहे. यासोबतच दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना IAS व IPS शिक्षा ही या संघटनेच्या माध्यमातून मोफत दिली जाते.सदरील ही संघटना मुस्लिम समाजबाधवांची सर्वात मोठी संघटना असून समाजातील अनेक गोरगरीबांच्या हितासाठी प्रयत्नशील असते.

Previous articleमुखेड तहसिल कर्मचाऱ्यांच्या घराला जंगलाचे स्वरुप त्यांची घरे शहरात का जंगलात कळायला मार्ग नाही
Next articleआष्टी येथे भाजपा पदाधिकारी,शक्ती केन्द्र प्रमुखांची आष्टी-ईल्लुर जि.प.क्षेत्राची बैठक संपन्न 20 फेब्रुवारी,2022 ला आष्टी-ईल्लुर जि.प.क्षेत्राचा कार्यकर्ते मेळावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here