Home नांदेड मुखेड तहसिल कर्मचाऱ्यांच्या घराला जंगलाचे स्वरुप त्यांची घरे शहरात का जंगलात कळायला...

मुखेड तहसिल कर्मचाऱ्यांच्या घराला जंगलाचे स्वरुप त्यांची घरे शहरात का जंगलात कळायला मार्ग नाही

100
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तहसिल कर्मचाऱ्यांच्या घराला जंगलाचे स्वरुप

त्यांची घरे शहरात का जंगलात कळायला मार्ग नाही

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तहसिल कार्यालय हे विविध समस्यांच्या विळख्यात अडकले असुन कंत्राटदाराच्या बोगस कामामुळे तहसिल कार्यालयाच्या नुतन ईमारतीत नागरीक व कर्मचा – यांना शौचालयाच्या समस्येसह विविध अडचणींना सामोरे जाये लागत आहे तसेच ज्या ठिकाणी तहसिलचे कर्मचारी वास्तव्यास रहातात त्यांच्या घराभोवतीच झाडी झुडप्यांनी वेढा घातल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे या महत्वपूर्ण विषयाकडे तहसिल व सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्यामुळे तेथिल कर्मचाऱ्यांना व तालुक्यातुन तहसिल कार्यलयास येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना दि . 08 फेब्रुवारी 2022 मंगळवार सामोरे जावे लागत आहे .
मुखेड तहसिलची ईमारत ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधलेली असुन या इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड यांच्या माध्यमातून नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनी मुंबई यांनी ५ कोटी २५ लक्ष रुपयात बांधकाम करण्यात आली आहे .. ईमारत बांधकाम करीत असताना कसल्याच प्रकारचे वास्तुरचना लक्षात न घेतल्यामुळे आता अनेक अडचणी निर्माण होत आहेत .
शहरातील तहसिल कार्यालयाची इमारत हे बाहेरुन पाहिल्यावर देखणी व प्रशस्त अशी मनप्रसन्न होण्यासारखी दिसते परंतु तहसिलच्या आतील भागात पाहिल्यास पावसाळयात बहुतांशी ठिकाणी छतामधुन पाण्याची गळती होत असते त्यामुळे कार्यालयात असलेल्या महत्वाचे कागदपत्रे भिजुन नुकसान होण्याची मिली कर्मचाऱ्यांच्या मनात असते , आशा या समस्यैमुळे कामाचा गोंधळ उडतो याबाबत महसुल कर्मचारी यांनी सुध्दा तहसिलदार यांच्याकडे दि . ३१ डिसेंबर २०२१ रोजी तक्रारी निवेदन सादर केले होते . पण याबाबत प्रशासन सुध्दा चुप्प असल्याने कर्मचायांसह नागरीकांना सुध्दा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तहसिल कार्यालयात कामानिमित्त येणा – या महिलांना प्रसाधनगृह उपलब्ध नसल्याने महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असुन अशावेळी महिलांची मोठी कुचंबणा होते त्यामुळे प्रशासनाने या बाबत पुढाकार घेऊन शौचालयाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा अशी मागणी होताना दिसत आहे . तहसिल कार्यालयाच्या मागील बाजूस कर्मचायांची वसाहत असुन त्याच्या घराला घाणीने वेढले असुन घराच्या आजुबाजूस झाडे झुडपे वाढली असुन यामुळे घरांना व येथील नागरीकांच्या जीवातीस मोठा धोका निर्माण झालेला आहे . याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात येथील नागरीकांनी गा – हाणे सुध्दा मांडले पण कोणीही ऐकायला तयार नाही अशी माहिती मिळत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here