Home नाशिक उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावास आजपासून सुरुवात;१३ दिवसापासून सुरु असलेला...

उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावास आजपासून सुरुवात;१३ दिवसापासून सुरु असलेला संप घेतला मागे

105
0

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0070.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
देवळा:- व्यापारी वर्गाने पुकारलेल्या संपामुळे गेल्या १३ दिवसांपासून बंद असलेल्या उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावास आज मांगळवार दि.३ रोजी व्यापाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे सुरुवात झाली.
लिलावास सकाळ सत्रात सुरुवात होईल अशी अपेक्षा असतांना सकाळ सत्रात मोजून १० ते १२ वाहनांची आवक आल्याने लिलाव सकाळच्या सत्रात न सुरू होता दुपारच्या सत्रात ४ वाजता सुरू झाला यावेळी कांद्याला जास्तीत जास्त २१०० ते सरासरी १८५० असा भाव मिळालाएकूण आवक जवळपास ४०० वाहन असल्याचे सहाय्यक सचिव तुषार गायकवाड यांनी सांगितले .मार्केट बंद होण्याच्या अगोदर पेक्षा २०० रुपये प्रतिक्विंटल कमी भाव मिळाल्याचे बघण्यास मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. गेल्या तेरा दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट असल्याने काल कांदा लिलाव सुरू झाल्याने आवक जरी कमी असली तरी आवार गजबजलेले दिसले .लिलाव बंदच्या या तेरा दिवसांत उमराणे आणि पंचक्रोशीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. तसेच या लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांच्या चाळीतील बराच कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे निदान लिलाव सुरू झाल्यावर तरी थोड्याफार प्रमाणात कांदा बाजारभाव वाढेल अशी अपेक्षा असलेल्या बळीराजाची मात्र घोर निराशा झाली. एक तर चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने खरिपाची पिके वाया गेली असून खरीप हंगामातील लाल कांदा देखील येणार नाही त्यामुळे साठवून ठेवलेला उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळून त्यातून येणारे सण उत्सव आनंदात साजरे करता येतील या अपेक्षेत असलेल्या बळीराजाची घोर निराशा झाली आहे.
प्रतिक्रिया १)गेल्या १३ दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव सुरू झाला मात्र १३ दिवसांपासून चाळीतील असलेला कांदा बऱ्याच प्रमाणात खराब झाला असून शासनाच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे .नाफेडमार्फत कांदा खरेदीचे शासनाने नुसतं गाजर दाखविले असून प्रत्यक्षात शासनाने ठरवून दिलेल्या भावात नाफेडमार्फत कांदा खरेदी होत नाही .शेतकऱ्यांनी संप केला तरी नुकसान शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांनी जरी संप केला तरी मात्र नुकसान हे शेतकऱ्यांचेच आहे
तुषार शिरसाठ, कांदा उत्पादक शेतकरी ,मेशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here