Home कोल्हापूर वडगांव पालिकेने कोविड सेंटर चालू करण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन

वडगांव पालिकेने कोविड सेंटर चालू करण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन

197

राजेंद्र पाटील राऊत

वडगांव पालिकेने कोविड सेंटर चालू करण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन                               कोल्हापूर,(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

वडगांव : शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असुन नगरपालिकेच्या वतीने मोफत कोविड केअर सेंटर चालु करणेसाठी वडगांव शहर काँग्रेसआय (अनुसुचित जाती विभाग ) यांचेवतीने  मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सद्या शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दोनशेहुन अधिक  झाली असुन शहरात सद्या तिन खासगी कोविड केअर सेंटर कार्यरत असुन त्याचा खर्च सर्वसामान्य लोकाना परवडणारा नाही. तसेच वाढत्या कोरोना रूग्णांच्यामुळे बेड उपलब्ध होत नाहीत त्या करीता वडगांव पालिकेने गेल्या वर्षीप्रमाणे मोफत कोविड केअर सेंटर सुरू करावे  यामुळे सर्वसामान्य  लोकांना त्याचा लाभ होईल याकरीता निवेदन देण्यात आले.
या निवेदनास पश्चिम महाराष्ट्र छावा युवा संघटणा अध्यक्ष शिवश्री रामदास गांजवे व भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाअध्यक्ष मोहन शिंदे यांनी पाठींबा दिला आहे .
निवेदन स्विकारताना वडगांव नगरपालिकेचे मुख्यधिकारी देसाई , यावेळी काँग्रेसचे जिल्हाप्रवक्ता रणजीत पाटील ,जिल्हासचिव रघुनाथ पिसे , मराठा महासंघाचे मोहन शिंदे , जिल्हासंघटक संताजी भोसले सर  , काँग्रेसचे (अनुसुचित जाती विभाग) शहर अध्यक्ष विकास कांबळे, हात.ता.मंडप डेकोरेशन अध्यक्ष फिरोज आत्तार ,वैभव घोरपडे इत्यादी उपस्थित होते.

Previous articleपंढरपुर पराभवाचे हादरे आता नांदेडपर्यंत शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपाच्या वाटेवर?       
Next articleराज्यस्तरीय स्वप्नसुंदरी स्पर्धेत धनगरी पोशाखात सौ.विजयमाला ठरल्या विजयी मानकरी     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.