Home नांदेड पंढरपुर पराभवाचे हादरे आता नांदेडपर्यंत शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपाच्या वाटेवर?     ...

पंढरपुर पराभवाचे हादरे आता नांदेडपर्यंत शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपाच्या वाटेवर?       

119
0

राजेंद्र पाटील राऊत

पंढरपुर पराभवाचे हादरे आता नांदेडपर्यंत शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपाच्या वाटेवर?                    देगलूर,( संजय कोकेंवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                               पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसून येत आहे. नांदेडमध्ये देगलूर- बिलोली मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात अनेक माध्यमाद्वारे पहावयास दिसत आहे. देगलूर पोटनिवडणुकीचे शिवसेनेने तिकीट न दिल्यास, भाजपचा झेंडा हाती धरण्याचा अप्रत्यक्ष इशाराच सुभाष साबणे यांनी दिला आहे. देगलूर बिलोली मतदार संघातील काँग्रेसचे आमदार कै.रावसाहेब अंतापूरकर साहेब यांचे गेल्या महिन्यात कोरोणामुळे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वेध अनेकांना लागले असून, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला पोट निवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे माजी आमदार सुभाष साबणे यांनी प्रसंगी पक्षाने तिकीट न दिल्यास, उमेदवारीसाठी भाजपात जायाची तयारी ठेवली आहे. देगलूर मध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी. असे आव्हानच साबणे यांनी पक्षप्रमुखांना केले आहे. शेवटी काय होईल याकडे सर्व नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here