Home अमरावती टोम्पे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा

टोम्पे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0048.jpg

टोम्पे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा

मयुर खापरे चादुंर बाजार
चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस व सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ. नंदकिशोर गव्हाळे, डॉ. लालबा दुमटकर, डॉ. युगंधरा गुल्हाने, डॉ. श्रीकृष्ण उबरहंडे, डॉ. उमेश कनेरकर, डॉ. तुषार नाकाडे, डॉ. प्रिया देवळे, डॉ. निधी दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून डॉ. लालबा दुमटकर यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका सविस्तर मांडले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना दिवस हा कार्यक्रम केंद्रीय मंत्रालयाचा असून महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण करणे हा उद्देश असून आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, वृक्षारोपण, स्वच्छता, देशभक्ती इत्यादी गुण रुजवणे हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे मत मांडले तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज स्थापनेस 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे महात्मा फुले यांच्या कार्यावरही प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. युगंधरा गुल्हाने यांनी केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleजिजाऊ बँकेच्या आमसभेत सभासदांचा प्रचंड गदारोळ, बँकेच्या कारभारावर आक्षेप.
Next articleचारशे पोलिस मराठा युवकांना मारण्यासाठीच आणले होते का? काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांचा खा. चिखलीकरांना सवाल!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here