Home नांदेड चारशे पोलिस मराठा युवकांना मारण्यासाठीच आणले होते का? काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार...

चारशे पोलिस मराठा युवकांना मारण्यासाठीच आणले होते का? काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांचा खा. चिखलीकरांना सवाल!

181
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0050.jpg

चारशे पोलिस मराठा युवकांना मारण्यासाठीच आणले होते का?

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांचा खा. चिखलीकरांना सवाल!

लोहा/प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण मराठवाड्यात मोठे आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. अनेक मराठा युवक आत्महत्या करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ नयेत असे आवाहन करण्यात आले असताना देखील मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम काहीजण करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या खासदारांनी चारशे पोलीस आणून भूमिपूजनाची हौस भागवून घेतली. मराठा आंदोलन दडपण्यासाठी व युवकांना मारण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त लावला होता का? असा सवाल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर जोडण्याच्या
कामाचा शुभारंभ खा. प्रताप पा चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. मराठवाड्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी सर्वच राजकीय सोहळे रद्द केले आहेत. आंदोलनास समर्थन देत या भागाचे खा. सुधाकर श्रृंगारे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली पण भाजपश्रेष्ठींना मर्दुमकी दाखविण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी हा कार्यक्रम करण्याचा अट्टाहास केला आहे

मराठा समाजाच्या युवकांबद्दल खा. चिखलीकर यांची पूर्वीपासूनच द्वेषाची भावना आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पहिल्यांदा

जेव्हा आणला.

तेव्हा मराठा युवकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मिरवणुकीत लाठीचार्ज केला आणि आता मराठा युवकांचे आंदोलन सुरु असताना मागील दोन दिवसांपासून उपोषणकर्त्यांना महसूल व पोलीस प्रशासनाकडून दडपशाही मार्गानि बोलावून घेऊन त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहेत. हे सर्व . प्रकार खासदारांच्या हट्टावरून होत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे खासदार आज समाजाच्या युवकांच्या जीवावर उठले आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

Previous articleटोम्पे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा
Next articleमराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश करण्यासाठी घंटानाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here