Home जळगाव मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश करण्यासाठी...

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश करण्यासाठी घंटानाद

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0074.jpg

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश करण्यासाठी घंटानाद

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश व्हावा म्हणून चाळीसगाव तहसील कार्यालय समोर दि. २५ रोजी चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने सहाव्या दिवशी घंटानाद करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्यात शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे लाखोंच्या संख्येने काढण्यात आले.मोर्चाची दखल घेउन तत्कालीन सरकारने आरक्षण दिले.मात्र आरक्षण देताना राज्य सरकारने वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण दिले ते सुप्रिम कोर्टात टिकले नाही. कोर्टात आरक्षण टिकावे म्हणून निष्णात वकील सुप्रीम कोर्टात न दिल्याने आरक्षण बारगळले यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाल्याने तत्कालीन राज्य सरकार विरोधात मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मराठा समाजातून आरक्षणाची सातत्याने मागणी होत असताना राज्य सरकार फक्त आरक्षण देण्याची आश्वासन मराठा समाजाला देत आहे,ठोस भूमिका घेऊन
राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी चाळीसगाव तहसील कार्यालया समोर दि. २५ सप्टेंबर रोजी सहाव्या दिवशी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद करण्यात आला.उपोषणात गणेश पवार,खुशाल पाटील,कुणाल पाटील,दिलीप पाटील,मनोज भोसले,समाधान पाटील,राजेंद्र पाटील,नितीन पाटील,सुधाकर वाघ,सुमित कापसे,खुशाल बिडे,अशोक भोसले,किशोर देशमुख,एन एम पाटील,राजेंद्र पाटील,योगेश पाटील,निलेश पाटील,आर बी जगताप,सुधीर पाटील,पी एन पाटील,धनंजय देशमुख,समाधान बच्छाव ,विजय देशमुख,मनोहर सूर्यवंशी,चेतन देशमुख,प्रदीप मराठे,संजय देशमुख,शेखर देशमुख,सागर देशमुख,
उमेश देशमुख किशोर पाटील , मुकुंद पवार ,राकेश राखुंडे,किरण आढाव,नाना तांबे, ज्ञानेश्वर कोल्हे ,संजीव पाटील,दिपक चव्हाण,पोपटराव वाबळे,राहुल शिंदे,अमोल पाटील,अनिकेत चव्हाण,नंदकिशोर पाटील,संजय देशमुख,डी एस मराठे,संजय मांडोळे,पदमाकर पाटील
यांच्यासह माहिला भगिनी सोनाली बोराडे, मिनाबाई सूर्यवंशी,
साखळी उपोषणाला मा. नगरसेवक भगवान राजपूत,रामचंद्र जाधव, यांनी पाठिंबा दर्शवला.माहिला भगिनी व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने साखळी उपोषणात सहभागी झाले, चाळीसगाव तालुक्यातील मराठा समाज बांधव,महिला भगिनी,विद्यार्थ्यांनी दि २६ ते २७ सप्टेंबर पर्यंत साखळी उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleचारशे पोलिस मराठा युवकांना मारण्यासाठीच आणले होते का? काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांचा खा. चिखलीकरांना सवाल!
Next articleअमळनेर येथे मंगळ ग्रह जन्मोत्सवानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here