Home अमरावती जिजाऊ बँकेच्या आमसभेत सभासदांचा प्रचंड गदारोळ, बँकेच्या कारभारावर आक्षेप.

जिजाऊ बँकेच्या आमसभेत सभासदांचा प्रचंड गदारोळ, बँकेच्या कारभारावर आक्षेप.

73
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230925-135955_WhatsApp.jpg

जिजाऊ बँकेच्या आमसभेत सभासदांचा प्रचंड गदारोळ, बँकेच्या कारभारावर आक्षेप.
—————————–
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा

पी. एन.देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रविवारी आयोजित वार्षिक सभेत ठेवीदारांची ठेवी आणि संचालकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सभासदांनी प्रचंड गदा रोड घातला. अश्विन चौधरी यांचे सभासद रद्द प्रकरण गाजले, तर वैष्णवी भार्गव या तरुणीने वडिलांच्या कर्ज प्रकरणाची जाब विचारून सत्ताधारी संचालकांची भंबेरी उडविले. आव्हाल पुस्तिका अध्यक्षांचे लांबलेले प्रस्ताविक व इतर मुद्द्यावर चांगलीच खडा जंगी झाली अखेर पोलिसांना पाचरण करावा लागले. जिजाऊ बँकेची वार्षिक आमसभा वादळी होणार याची चूणक संचालकांना मिळाल्याने आधी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. अध्यक्ष अविनाश कोठाळे यांच्या अध्यक्षतेत सभेला सुरुवात होता सुरुवातीला इति वृत्तांत घेण्यात आले त्यानंतर अध्यक्षांनी प्रस्तविकेला सुरुवात केली बँकेची कार्यपद्धती तसेच सभासदामध्ये बँकेविषयी होत असलेला अप्रचार, ठेवी या सर्व मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला. मात्र त्यांच्या प्रस्ताविकावर सभासदांनी आक्षेप घेतला. अध्यक्षाच्या भाषणात अनावश्यक बाबी असल्याचा आरोप सभासदांनी केला. त्यावेळी चांगलाच गदा रोड झाला प्रस्ताविकास अध्यक्षांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या एका प्रकरणाचा अहवाला दिल्यानंतर सभासद आक्रमक झाले. अध्यक्षांनी पुरुषोत्तम खेडेकर यांची माफी मागावी, यासाठी काही सभासदांनी भावनात खुल्या जागेवर जाऊन आरडाओरडा सुरू केली. तर तर काहींनी थेट व्यासपीठाकडे धाव घेतली. सी इ ओ चे प्रशासनावर नियंत्रण नसण्याचा आरोप सभासदांनी केला. त्यावेळी सभासदाकडील माईक बंद करण्याचे आदेश अध्यक्षांनी दीले आणि गोंधळात आणखीन भर पडली. काही सभासदांनी इतिवृत्त घरपोच न मिळालेले नाराजी व्यक्त केली तर बँकेच्या आर्थिक अहवाल पुस्तकेत आलेख चुका आढळून आल्याने सभासदांनी सत्ताधाऱ्यांनी चांगले धावेवर धरले. आम सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. प्रकरण वडिलांच्या खात्यातील २५ पंचवीस लाख गेले कुठे? या प्रकरणावरून वाद वाढला. मोर्शी येथील वैष्णवी संजय भार्गव या युतीने जिजाऊ बँकेने ७२ लाखाचे कर्ज मंजूर केले पण २५ लाखाची रक्कम कोणाच्या खात्यात गेली? असा सवाल उपस्थित करून अध्यक्षसह इतर संचालकालांची बोलती बंद केली. अति रक्कम ट्रान्सफर झाली कशी अशी विचारणा करीत असताना माइक बंद करण्याचा फरमाना झाले. तपासणी अहवालाच्या आधारेच बँकेच्या अनियमित कारभाराबाबत अनेक अनेक पेपरात वृत्त प्रकाशित झाले होते लोक दरबारात मांडले रविवारी आमसभेत अशा वृत्तावर अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी आक्षेप घेतला. कोठाळे यांना रिझर्व बँक व न्यायव्यवस्था व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कारभार मान्य नाही तर मीच म्हणजे सर्व काही अशा अविर्भावात त्यांनी प्रस्तावित केले वृत्तपत्राकडे खरे तर पुरावे आहेत. अहवाल खोटा असेल तर वरिष्ठ पातळीवर जात मागावी असे अपेक्षित आहे. सभासदांनी ठेवी सुरक्षित असावी आणि बँकेच्या ढासळलेल्या कारभारावर बोट ठेवले असून, तो त्यांचा अधिकार असल्याची भावना अनेक सभासदांची असल्याने दिसून आले. सदर बँकेच्या इतिहासात या आमसभेला पहिल्यांदाच तू तू झाली. जिजाऊ बँक आणि ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असाव्यात व निवडणूकिच्या अनुषंगाने पद व खुर्चीसाठी भांडण किंवा बँकेला कोणती बदनाम करू नये ही बँक सामान्याची आहे कुणाच्याही खासगी मालमत्ता नाही. याचा देखील विचार व्हावा असे एडवोकेट श्रीकांत खोरगडे सभासद जिजाऊ कमर्शियल बँकेचे अमरावती येथील यांनी व्यक्त केले.

Previous articleवनसगांव विद्यालयात १३४ वा कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा उत्साहात संपन्न…
Next articleटोम्पे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here