Home नाशिक वनसगांव विद्यालयात १३४ वा कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा उत्साहात संपन्न…

वनसगांव विद्यालयात १३४ वा कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा उत्साहात संपन्न…

183
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0044.jpg

वनसगांव विद्यालयात १३४ वा कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा उत्साहात संपन्न…

पारंपारीक वेशभूषेसह लेझीम व टिपरी नृत्याचे उत्तम सादरीकरण

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

वनसगांव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राचे थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॅा. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६ वा जयंती सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनंजय रत्नाकर डुंबरे (अध्यक्ष, वनसगाव शिक्षण प्रसारक मंडळ) हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सौ.दुर्गाताई तांबे (नगराध्यक्ष संगमनेर), डॉ.सुजित गुंजाळ (जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा) ,शिवा पाटील सुरासे (माजी पंचायत समिती सभापती निफाड), आप्पासाहेब गाडे( कंपनी एरिया मॅनेजर) ,एकनाथ लक्ष्मण शिंदे (व्यवस्थापक वनसगांव शिक्षण प्रसारक मंडळ) ,सौ.नंदाताई तांबे यांच्यासह प्रमुख वक्ते म्हणून समीर देवढे सर (लेखक ,लासलगांव‌) आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी विद्यालयाच्या अभिवादन स्थळी कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तदनंतर विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्र प्रदर्शन व रांगोळी दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .मान्यवरांनी चित्र व रांगोळीचे भरभरून कौतुक केले.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष स्थानाची सूचना उपशिक्षक अर्जुन चव्हाण यांनी मांडली तर अनुमोदन उपशिक्षक नितीन पिंगळे यांनी दिले. विद्यालयाच्या गीतमंचासह उपशिक्षक ज्ञानेश्वर कुशारे यांनी ईशस्तवन , स्वागतगीत व रयत गीत सादर केले. विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे यांनी प्रास्ताविकातून मान्यवरांचे स्वागत करताना कर्मवीरांच्या कार्याला अभिवादन केले. पर्यवेक्षक के.बी. दरेकर यांनी अहवाल वाचनातून विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने शाल व बुके देऊन स्वागत करण्यात आले.इयत्ता दहावी व बारावी मार्च २०२३ परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. कै. केदू सदू शिंदे यांच्या स्मरणार्थ तसेच कै. शिवराम रामचंद्र शिंदे व कै.गं.भा.सईबाई गोटीराम व्यवहारे यांच्या स्मरणार्थ संस्थेकडे ठेवलेल्या ठेवीतील व्याजाच्या रकमेतून दरवर्षीप्रमाणे पारितोषिके देण्यात आली. यासह कै. महिपतराव यशवंतराव डुंबरे यांच्या स्मरणार्थ , कै. सतीश विठ्ठलराव शिंदे यांच्या स्मरणार्थ, कै. रत्नाकर महिपतराव डुंबरे यांच्या स्मरणार्थ तसेच राम विजय क्लिनिकचे डॉ.योगेश डुंबरे यांचे कडून, ॲड. रामनाथ भगीरथ शिंदे यांचे कडून रोख स्वरूपांची पारितोषिकेही दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यालयाला कर्मवीर जयंतीनिमित्त विविध माध्यमातून सहकार्य व देणगी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे अशोकराव डुंबरे, मनेशकुमार शिंदे,योगेश डुंबरे, धनंजय डुंबरे, सुनिल जयराम शिंदे,सुनिल उमाजी शिंदे, ज्ञानेश्वर फकिरा शिंदे,डॉ. उत्तमराव शिंदे ,पत्रकार रामभाऊ आवारे सर ,आप्पासाहेब गाडे यांना आभार पत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयाच्या कर्मवीर जयंती निमित्त संपन्न झालेल्या निबंध ,वक्तृत्व, गायन, कथाकथन, रांगोळी या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना कै. उमाजी किसन शिंदे यांच्या स्मरणार्थ सुनील उमाजी शिंदे (साई स्वराज्य फार्मर प्रोड्युसर कंपनी) यांचे तर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर डॉ. उत्तमराव दत्तात्रेय शिंदे यांचे तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ही गौरव याप्रसंगी करण्यात आला. इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड व गिरणा गौरव प्रतिष्ठानचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे, विद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख वारकरी मंचचे प्रदेशाध्यक्ष रामभाऊ आवारे सर ,स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाच्या ऑडिशन मध्ये सहभाग घेतलेला विक्रांत साळवे यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.कु कल्याणी जगन शिंदे (१०अ )या विद्यार्थिनीने मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील बोलते हा एक पात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख अतिथी सौ.दुर्गाताई तांबे यांनी कर्मवीरांच्या कार्याचा गौरव करताना ग्रामीण भागातील शिक्षण हे सर्वार्थाने अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. शिवा पाटील सुरासे यांनी विद्यालयातील उपक्रमांचे कौतुक करताना विद्यालयास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. प्रमुख वक्ते समीर देवढे यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना रयतचे विद्यार्थी म्हणून अभिमान असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय डुंबरे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक करताना मान्यवरांनी विद्यालयास वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपक गायकवाड यांनी केले तर आभार बाळासाहेब गांजवे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर संदीप वन्से यांच्या योगदानातून विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
कर्मवीर जयंती सोहळ्यास विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी चे सर्व सदस्य, वनसगाव शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, माता पालक संघाच्या सदस्या ,माजी विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य- ग्रामपंचायत वनसगाव थेटाळे ब्राह्मणगाव सारोळे खुर्द ,वनसगाव व सारोळे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हा.चेअरमन व संचालक, पत्रकार,शिक्षण प्रेमी नागरिक ,आजी माजी मुख्याध्यापक,रयत सेवक, विविध पदाधिकारी ,विद्यालयातील सर्व सेवकवृंद‌ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleलासलगाव ला “ती” चा गणपती’ महिला कार्यक्रम उत्साहात संपन्न–
Next articleजिजाऊ बँकेच्या आमसभेत सभासदांचा प्रचंड गदारोळ, बँकेच्या कारभारावर आक्षेप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here