Home पुणे भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे पुण्यात निधन

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे पुण्यात निधन

108

आशाताई बच्छाव

IMG-20221222-WA0033.jpg

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे पुण्यात निधन    (विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

पुणे: पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे उपचारदरम्यान निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कर्करोगाशी झुंज देत होत्या,अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.यांचे आज दु.३.३० वा निधन झाले. त्या ५६ वर्षांच्या होत्या.मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौरपदही त्यांनी भूषवले होते. त्यांच्यामागे पती शैलेश टिळक, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल टिळक असे कुटुंबीय आहेत.
शुक्रवारी (दि.२३ )सकाळी अंत्यदर्शनसाठी ९.०० ते ११.०० केसरीवाडा येथील राहत्या घरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशामभूमी येथे सकाळी ११.०० नंतर करण्यात येतील.

Previous articleबिना परवाना किती वाहतूक करताना पाच मोठे जड वाहन पकडले तहसीलदार गायकवाड यांची धाडसी कारवाई
Next articleदिव्यांग व्यक्तीवरील अत्याचारातील आरोपी तामगाव पोलीस स्टेशनला अटकेत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.