Home नाशिक लासलगाव ला “ती” चा गणपती’ महिला कार्यक्रम उत्साहात संपन्न–

लासलगाव ला “ती” चा गणपती’ महिला कार्यक्रम उत्साहात संपन्न–

354
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0046.jpg

लासलगाव ला “ती” चा गणपती’ महिला कार्यक्रम उत्साहात संपन्न–

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

लासलगाव तालुका निफाड येथील अहिल्यादेवी चौकातील शिवरत्न गणेश मित्र मंडळ येथे ती आहे म्हणून जग आहे सन्मान तिच्यातील “ती” चा लोकमत सखी मंच तर्फे ती चा गणपती या आध्यत्मिक उपक्रमात समाजासाठी अविरत सेवा देणाऱ्या सेवा सहयोग समर्पण देणाऱ्या कर्तव्य कर्तृत्व पार पाडणाऱ्या सखी ती चा गणपती ती चा सन्मान उपक्रम उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती मैत्री गृप प्रमुख तथा विश्वस्त ब्राह्मण महासंघ सौ स्मिताताई कुलकर्णी यांनी दिली आहे.
या उपक्रमात आरती चे मानकरी डॉ भाग्यश्री सोनावणे, ज्योती ताई निकम ग्रामपंचायत सदस्य ,अर्चना सोनवणे,भजन सेवा संगीता भागवत या मानकरी होत्या.अहिल्या देवी चौक शिवरत्न गणेश मंडळात आरती घेण्यात आली. याच कार्यक्रमात जाणीवांचा स्पर्श हा महिला प्रबोधन कार्यक्रम नाट्यमय रुपात व खुली चर्चा असा घेण्यात आला उत्स्फूर्तपणे सदरील कार्यक्रम झाला. ब्राह्मण महासंघ विश्वस्त तथा मैत्री ग्रुप प्रमुख स्मिता शेखर कुलकर्णी यांच्या नेतृत्वात तसेच त्यांनी सद्य स्थितीत घडणाऱ्या महिला व मुलींच्या बाबतीतली घटना व सावधगिरी यावर मार्गदर्शन केले. डॉ भाग्यश्री सोनवणे यांनी मुलींनी सुरक्षितता कशी बाळगावी? यावर मनोगत व्यक्त केले. कविता चव्हाण यांनी मुलींना परिसरातील घडामोडी स्वतःची काळजी यावर मत व्यक्त केलं तसेच शिक्षिका जयश्री निकम यांनी मुलींना स्वतःची काळजी माणसे ओळखणे यावर मनोगत व्यक्त केले. तसेच ब्राह्मण महासंघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अक्षदा जोशी, मैत्री ग्रुप च्या कविता चव्हाण, मैत्री ग्रुप च्या आरती सोनवणे ,शैला सोनवणे ,सोनाली कर्डीले यांनी नाट्यमय भूमिका साकारल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमत सखी मंच सदस्य व मैत्री ग्रुप चे योगदान होते यावेळी सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले तर आभार अक्षदा जोशी यांनी मानले. यावेळी डॉ भाग्यश्री सोनवणे ,अलका पवार ,अर्चना चव्हाण, मनीषा जाधव, मनीषा लुटे, नलिनी सोनवणे, अर्चना शिरसाठ, शोभा इंगळे, भारती इंगळे ,जया निकम ,ज्योती निकम, सोनाली कर्डीले, कविता कर्डीले ,राधिका जाधव, रेखा रायजादे अक्षदा जोशी, आरती सोनवणे ,मंगल शिरसाठ ,सुचित्रा रायजादे, संजीवनी सोनवणे, कविता चव्हाण, कविता पवार, संगीता भागवत, वृषाली देवढे ,प्रतिभा विसपुते, मधुरा निकम, मंजू पवार ,वैष्णवी जाधव, सई जाधव, समृद्धी खैरे ,स्वरा सोनवणे, रुचिता कर्डिले, वैष्णवी विसपुते ,रेणुका भागवत, आकृती शेजवळ ,निर्मला जाधव, मुक्ताबाई शिरसाठ व इतर महिला उपस्थित होत्या.

Previous articleमोठ्ठी बातमी खळबळजनक प्रेयसीच्या आईला व भावाला जिवंत जाळून त्या तरुणाने स्वतःला पेटवुन आत्महत्या केली..
Next articleवनसगांव विद्यालयात १३४ वा कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा उत्साहात संपन्न…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here