Home अमरावती मोठ्ठी बातमी खळबळजनक प्रेयसीच्या आईला व भावाला जिवंत जाळून त्या तरुणाने स्वतःला...

मोठ्ठी बातमी खळबळजनक प्रेयसीच्या आईला व भावाला जिवंत जाळून त्या तरुणाने स्वतःला पेटवुन आत्महत्या केली..

232
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230925-133012_WhatsApp.jpg

प्रेयसीच्या आईला व भावाला जिवंत जाळून त्या तरुणाने स्वतःला पेटवुन आत्महत्या केली..
——————————
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन.
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती
अमरावती येथे एका माथेफिरू तरुणाने आपल्या प्रियसीच्या आईला व भावाला जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीच्या आईचा व भावाचा खून केल्यानंतर त्या तरुणाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वरुड तालुक्यातील वंडली या ग्रामीण गावात रविवारी रात्री १ वाजेच्या दरम्यान ही थरारक घटना घडली. आरोपी आशिष ठाकरे वय २५ असे या माथेफीरु तरुणाचे नाव आहे. लता सुरेशराव भोंडे वय ४५ आणि त्यांचा मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे वय २० अशी जाळून खून करण्यात आलेल्यांची नावे आहे. आरोपी आशिष ठाकरेंनीही नंतर स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे तरुण व तरुणी लिव्ह इन मध्ये राहत होते. घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही महिन्यापासून तरुण आणि त्याची प्रेयशी एकत्र राहत होते. त्यांच्यातील प्रेम संबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्या मुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. काही काळाने या दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. त्यांच्यामधील वाद वाढत गेला. त्यानंतर तरुणीने तरुणा सोबत संबंध तोडले व पुन्हा आपल्या घरी राहायला आली. प्रेयशीच्या आई व भावासोबत वादावाद भांडणे झाले होते. प्रियकराशी भांडण झाल्यानंतर गेल्या काही दिवसापासून प्रेयसी आपल्या घरी राहत होती. ती आई आणि भावासोबत राहत होती प्रेयसीला आपल्या सोबत पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रियकार सतत तिच्या घरी जात होता. तरुणीची आई आणि भाऊ पुन्हा तरुणीला तरुणासोबत पाठवण्यास तयार नव्हते. या दरम्यान, तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबतही तरुणाचे भांडण प्रेयसीच्या आई व भावाने केलेल्या भांडणाचा राग मनात ठेवून त्यात तरुणांनी असे कृत्य केल्याचे समोर येत आहे. प्रेयसी घरी नसताना हा तरुण तिच्या घरी गेला व त्याने तिच्या आईला आणि भावाला जिवंत जाळले मात्र, नंतर आपण केलेल्या क्रुत्यामुळे भयभीत होऊन त्याने स्वतःलाही संपून घेतले याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here