Home Breaking News 🛑 गणपतीसाठी गावी येणार्‍यांना क्वारंटाईन व्हावेच लागणार! 🛑

🛑 गणपतीसाठी गावी येणार्‍यांना क्वारंटाईन व्हावेच लागणार! 🛑

113
0

🛑 गणपतीसाठी गावी येणार्‍यांना क्वारंटाईन व्हावेच लागणार! 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 10 ऑगस्ट : ⭕ येत्या २२ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival in Konkan) बाहेरगावाहून येणार्‍यांना १० ते १४ दिवसांपर्यंत क्वारंटाईन व्हावे लागणार असून, त्यासाठी नागोठणे विभागातील, तसेच पाली ग्रामपंचायतीने नियमावली जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देण्यावरून आणि ती कोणत्या नियमांच्या आधारे दिली जावी यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाली ग्रामपंचायतीने आणि नागोठणे विभागातील इतर काही गावांनी जाहीर केलेली नियमावली महत्त्वाची ठरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहे आणि सुधागड तालुक्यात कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा चिंताजनक असून, या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय या ग्रामपंचायतींच्या प्रशासनाने घेतला आहे. नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले की, १ ऑगस्टपासून ग्रामपंचायतीच्या कोव्हिड नियंत्रण कक्षात (Covid Center) बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची संख्या १२ पर्यंत झाली असून, त्यांना १४ दिवस क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे. तसेच त्यांचा हातावर शिक्का, तसेच संबंधित पत्रसुद्धा देण्यात आले आहे. येणार्‍यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. वरवठणे, पिगोंडे येथेही हाच निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच राजश्री दाभाडे, संतोष कोळी यांनी दिली. कडसुरे, वणी, पाटणसई, वांगणी, पळस, ऐनघर आदी ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍यांनाही क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

दरम्यान, पाली येथे येणार्‍या चाकरमान्यांसाठी १२ तारखेची डेडलाईन देण्यात आली असून, त्यानंतर त्यांना १० दिवसांकरिता होम क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला असून, येणारे सर्वजण सहकार्य करतील, असा विश्वास सरपंच तथा कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीचे अध्यक्ष गणेश बाळके यांनी व्यक्त केला आहे.⭕

Previous article*सटाणा तालुक्यातील तताणी आश्रम शाळेत आदिवासी दिवस उत्साहात साजरा *
Next article🛑 BSNL आता घरोघरी इंटरनेटची सुविधा देणार, लाँच केले BookMyFiber पोर्टल 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here