आशाताई बच्छाव
लासलगाव गटाचे चे प्रश्न मार्गी लावा- दिशा समिती मार्फत सौ सुवर्णाताई जगताप यांची मागणी
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
दिशा समितीची सभा केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली केंद्र सरकारच्या योजना या जनतेच्या कल्याणासाठी आहेत दिशा समिती शहरासह गाव पातळीवर शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम सातत्याने करीत आहे.
यावेळी भारती पवार म्हणाल्या उद्यापासून जिल्ह्यात आयुष्यमान भव मोहीम सुरू होत असून 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत होणाऱ्या सेवा पंधरवड्यात आरोग्य विषयक कार्यक्रम व मेळावे राबविण्यात येणार आहे या योजनेसंदर्भात दर्शनीवारी मेळाव्याच्या आयोजन होणार असून यात नागरिकांना आजाराच्या चाचणी उपचार सुविधा दिल्या जाणार आहेत याबाबत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्याचे तसेच आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड उर्वरित लाभार्थ्यांना प्रदान करण्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आयुष्यमानभव ,विश्वकर्मा योजना ,जल जीवन मिशन योजना प्रधानमंत्री सडक योजना मुख्यमंत्री रोजगार योजना स्वच्छता अभियान अशा वेगवेगळ्या माध्यमातून रस्ते पाणी आरोग्य वीज आदि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जवळपास 1600 कोटींपेक्षा जास्त निधी नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाला आहे त्याचाही आढावा यावेळी घेण्यात आला तसेच रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत असे निर्देश डॉ भारती पवार यांनी दिले.
दिशा समिती अशासकीय सदस्या सुवर्णा जगताप यांनी काही प्रश्न उपस्थित केले त्यावर नामदार भारतीय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करून त्वरित ते प्रश्न मार्गी लावावेत असे निर्देश दिले.
1. लासलगाव येथील रेल्वे गेट नंबर 105 मधील उड्डाणपुलाचे काम 2016 पासून चालू आहे पूर्ण झाला परंतु शेतकऱ्यांकडे 84 आर जमीन अधिग्रहण करण्याचे काम बाकी असून त्यांचे 1 कोटी 27 लाख रुपये देण्याचे बाकी आहे नामदार भारती पवार यांनी दोन महिन्यात त्यांचे सर्व पैसे अदा करून उड्डाणपूल लवकरात लवकर लासलगावकरांच्या सेवेत चालू करण्याचे आदेश दिले. उड्डाणपुलासाठी रेल्वेने 15 कोटी अगोदरच खर्च केल्या असून शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे त्वरित देण्यात यावेत असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले
2. कोटमगाव ब्रिज खाली कायम पाणी साचत असल्याने तो रस्ता रहदारीसाठी अतिशय धोकादायक झाला आहे लासलगाव बाजार समितीत येजा करत असणारे टट्रॅक्टर्स ,शाळेत जाणारे विद्यार्थी ,रहिवासी यांना त्या रस्त्याचा वापर करताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते रेल्वेचे इंजिनियर यांना याबाबत विचारले असता लवकरात लवकर येत्या दोन महिन्यात कोटमगाव येथील रेल्वे गेट क्रमांक 104 चे रेल्वे अंडर ब्रिजचे काम चालू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
3. लासलगाव मधील शिव नदीच्या सुशोभीकरनासाठी 18 कोटी रुपये मंजूर झाले आहेत ,परंतु सुवर्णा जगताप यांनी नदीला लागून कचरा डेपो असल्याचे निदर्शनास आणून दिले. या कचरा डेपो चा पूर्ण कचरा हा कायम नदीत जात असल्यामुळे व तिथे जवळच असलेल्या विहिरीचे पाणी शास्त्रीनगर व जवळच्या गावात जात असते ते पाणी कचरा डेपोमुळे पूर्णपणे दूषित होऊन कडू व हिरवे झाले आहे.
लासलगाव वार्ड क्रमांक तीन आणि शास्त्रीनगर येथे मोठ्या संख्येने रहिवासी नागरिक राहतात त्यांच्या आरोग्याचा विचार करून कचरा डेपोच्या वेस्ट मटेरियल पासून कंपोस्ट खत प्रकल्प किंवा एनर्जी प्रकल्प चालू करून नंतरच नदी सुशोभीकरणाचा विचार करावा कारण कचऱ्यामुळे नदी दूषित होत असून मूळ कारणाचा नायनाट करून नागरिकांच्या पैशाचा सदुपयोग करावा असे निर्देश भारती पवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांना दिले.
4. ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे पोस्टमार्टम सेंटरचे काम अपूर्ण असून लवकरात लवकर ते काम पूर्ण करून ग्रामीण रुग्णालयास हस्तांतरित करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या सीईओ यांना यावेळी भारती पवार यांनी दिले.
पुढील दिशा कमिटीची मीटिंग घेण्याअगोदर वरील सर्व कामे मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, मालेगाव महानगरपालिका प्रशासक भालचंद्र गोसावी , जिल्हा विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरकर, दिशा समितीच्या अशासकीय सदस्य सुवर्णा जगताप, अरुण माऊली , राहुल केदारे, हितेश पगारे यांच्यासह 52 विभागाचे सर्व एच.ओ.डी. प्रमुख अधिकारी उपस्थित होते.