Home अमरावती पत्रकारातेला विधायक दिशा देण्यासाठी लोकस्वातंत्र पत्रकार संघटनेसारख्या संघटनची गरज.—सोनल अग्रवाल.

पत्रकारातेला विधायक दिशा देण्यासाठी लोकस्वातंत्र पत्रकार संघटनेसारख्या संघटनची गरज.—सोनल अग्रवाल.

184
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230820-211438_WhatsApp.jpg

पत्रकारातेला विधायक दिशा देण्यासाठी लोकस्वातंत्र पत्रकार संघटनेसारख्या संघटनची गरज.—सोनल अग्रवाल.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख याजकडुन
अमरावती.

 

पत्रकारितेमध्ये सक्रिय राहून सामाजिक विकासासाठी कृतिशीलतेने सतत चालत राहणाऱ्या पत्रकारांना स्वतःचे स्वास्थ आणि जीवनाचीही सुरक्षितता असली पाहिजे.काही अपवाद वगळता पत्रकारिता खूप चांगली आहे.तिला विधायक दिशा देण्यासाठी रचनात्मक आणि पारदर्शक वाटचाल ठेवणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघासारख्या संघटनांची खरी आवश्यकता आहे. असे प्रतिपादन पंजाब नॅशनल बँकेच्या पिएनबी मिट लाईफच्या विभागीय व्यवस्थापिका सौ.सोनल अग्रवाल यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या २४ व्या मासिक विचार मंथन मेळाव्यात त्या प्रमुख अतिथी होत्या.संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष तथा इंडियन लॅग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन ( ईलना) चे राष्ट्रीय सचिव यांचे अध्यक्षतेखाली स्थानिक जठारपेठेतील आणि जैन रेस्ट्रोमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण सेवा संस्थेचे नवनियुक्त अकोला जिल्हा समादेशक,पत्रकार डॉ.मयूर लहाने हे या कार्यक्रमाला अतिथी तर केन्द्रीय मार्गदर्शक प्रा.डॉ.संतोषजी हूशे,खामगांव येथून विदर्भ विभागीय संघटन,संपर्क प्रमुख पंजाबराव देशमुख,रामराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी लहाने यांचा नियुक्तिबध्दल,पत्रकार मोनिष चौबे यांचा नेट सेट मधील यशासाठी ,ज्येष्ठ कवी सुरेश पाचकवडे यांचा विद्यापीठ अभ्यासक्रमातील कविता समाविष्ट झाल्याबद्दल त्यांचा व सौ.सोनल अग्रवाल यांचा शाल,सन्मानपत्र,वृक्ष व “महायाग” कादंबरी आणि “शॉर्टफिल्मस्” पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला‌.पत्रकार विवेक मेतकर यांचाही जन्मदिन शुभेच्छा म्हणून सत्कार करण्यात येऊन अध्यक्षांसह ईतरांची स्वागतं करण्यात आली.

सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यचे सामाजिक सेवेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला हारार्पण आणि वंदन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी डॉ.मयूर लहाने यांचे वाहतूक आणि दक्षता या विषयावर मार्गदर्शन, तर पंजाबराव देशमुख यांनी सुध्दा आपली मनोगते व्यक्त केली.संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून १५ दिवसांत पार पडलेल्या ३ शालेय उपक्रमाची माहिती देऊन जमा खर्चाची माहिती दिली.

या कार्यक्रमाला केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे,किशोर मानकर,अंबादास तल्हार,मार्गदर्शक व साहित्य संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे,विदर्भ विभागीय संघटन संपर्क प्रमुख डॉ.विनय दांदळे, सुरेशभाऊ पाचकवडे, सौ.जया भारती, अॕड.नितीन धूत,अशोककुमार पंड्या,जिल्हा उपाध्यक्ष विवेक मेतकर,सहसचिव सागर लोडम,पत्रकार मोनिष चौबे,सतिश देशमुख,दिलीप नवले,सौ.दिपाली बाहेकर, अशोक सिरसाट,मनोज देशमुख, पंकज देशमुख, सुनिल पांडे व इतर सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन सौ.जया भारती यांनी तर प्रास्ताविक राजेन्द्र देशमुख आणि आभारप्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.

Previous articleलोकप्रिय खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या हस्ते अल्टामेड फार्मा मेडिकल एजन्सी,चे नांदेड येथे भव्य उद्घाटन
Next articleव-हाणे प्रकरणात वेंदे साहेब; काय चाललेत हे धंदे!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here