Home माझं गाव माझं गा-हाणं मालेगाव झोडगे येथे एकाचाआत्मदहनाचा प्रयत्न

मालेगाव झोडगे येथे एकाचाआत्मदहनाचा प्रयत्न

344
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगाव झोडगे येथे एकाचाआत्मदहनाचा प्रयत्न

प्रतिनिधी. प्रवीण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क

मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे ग्रामपंचायतीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यातील सविस्तर वृत्त असे की झोडगे गावातील अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढण्यात यावे दोन-तीन वेळेस अर्ज देऊन ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढले नाही.

वसंत नेरकर यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करून देखील त्या कारणावरून वसंत नेरकर यांनी ग्रामपंचायत समोर अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की झोडगे येथील ग्रामपंचायत हद्दीतील गल्ली नंबर 1 मध्ये गावठाण जागेवर ग्रामपंचायतीच्या उघड्या गटारी वर असलेले किराणा दुकानाची टपरी अतिक्रमण काढण्यासाठी वसंत वामन नेरकर यांनी अर्ज दिला होता.

मात्र सदर अतिक्रमण काढण्यासाठी 21 जून रोजी ची तारीख निश्चित झाली होती. तरी देखील सदर अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी 22. 6 .2021रोजी आत्मदहन करण्यासंदर्भात पुन्हा अर्ज दिला.

त्याच प्रमाणे तक्रारदार आज कुटुंबीयांसोबत येऊन स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सदर घडलेल्या घटनेनंतर नेरकर यांना अतिक्रमण काढून देण्याकरिता 15 दिवसांची मुदत मागून घेतल्याचे समजते.

Previous articleपेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी मोर्चा
Next articleनाशिक जिल्ह्यात वटपौर्णिमा पूजन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here