Home संपादकीय व-हाणे प्रकरणात वेंदे साहेब; काय चाललेत हे धंदे!

व-हाणे प्रकरणात वेंदे साहेब; काय चाललेत हे धंदे!

145
0

राजेंद्र पाटील राऊत

20230821_135616-BlendCollage.jpg

संपादकीय अग्रलेख…
व-हाणे प्रकरणात वेंदे साहेब; काय चाललेत हे धंदे!
वाचकहो,
यथा राजा तथा प्रजा असं म्हटल जातंय..ज्या राज्यांचा कारभारी जसा राहिल तशीच प्रजा देखील अंदाधुंदी व खोटे नाटे कामे करण्यात माहिर असते.या अग्रलेखाचे संक्षिप्त तात्पर्य एव्हढेच की,व-हाणे प्रकरणात कागदोपत्री लांडयालबाडया झालेल्या आहेत हे सुर्यप्रकाशा इतके
स्वच्छ व ठळकपणे दिसत असतानाही,वेळकाढू भुमिका घेऊन या प्रकरणी चालढकल करण्याचे व चोराला साव बनविण्यासाठी खुलाश्यांवर खुलासे करायला संधी देण्याचे धंदे गटविकास अधिकारी वेंदे नेमके कुणाच्या आशिर्वादाने करत आहेत की,त्यांचेवर कुणा राजकीय शक्तीचा दबाव येत आहे.याचाही खरे तर आता जनतेसमोर न्यायनिवाडा होणे गरजेचे आहे.या देशात लोकशाही नावाची काही तरी सामान्यांच्या हक्कासाठी बहाल केलेली शक्ती घटनेने दिलेली असल्याचा बहुतेक गटविकास अधिकारी वेंदे यांना विसर पडलेला असावा,म्हणून तर ४ आँक्टोबर २०२१ रोजी व-हाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अनिता पवार यांनी खोटी व बनावट ग्रामसभा आयोजीत करुन ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांच्या संगनमताने कोरम संख्या अवघी ९५ इतकी असताना पदाचा गैरवापर करुन शासनाची फसवणूक केलेली स्पष्टपणे दिसत असताना सुध्दा सरपंच सौ.अनिता पवार यांचेवर कलम ३९ नुसार पदावरून अपात्र करण्याची व ग्रामसेविका सांळुखेंवर तडकाफडकी निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करणे हे गटविकास अधिकारी भरत वेंदे यांचे आद्यकर्तव्य ठरते,येथे मात्र सगळेच उलटे व विपरीत घडताना दिसत आहे.चोराला तु चोर आहे का? याचा खुलासा करण्याची संधी देणे म्हणजे येथे नक्कीच शंकेची पाल चुकचुकते.लोकशाही राज्यात सामान्य माणूस आपल्या हक्कासाठी संघर्ष करुन करुन शेवटी मरुन जातो.पण हे प्रशासनातले निर्ढावलेले अधिकारी आपले हात ओले करुन लबाडांचे भले करण्यासाठीच जणू प्रशासनात बसलेत की काय? अशी शंका आता सर्वसामान्य नागरीक व्यक्त करताना दिसतात.आंधळ्याने दळत बसायचे अन कुत्र्याने पीठ पुर्ण चाटून पुसून खाऊन टाकायचे हि पध्दत लोकशाहीला घातक आहे.गटविकास अधिकारी वेंदे यांनी व-हाणे प्रकरणात वेळीच सावध होऊन योग्य मार्गानेच कार्यवाही प्रस्तावीत करावी.त्यासाठी आता क्षणाचाही विलंब नको…अन्यथा हे बुमरँग आपल्यावरच उलटल्या शिवाय राहणार नाही हाच आमचा सबुरीचा सल्ला…व-हाणे प्रकरणाची आग तर पेटलीच आहे.पण या आगीत कुणी कुणाला पाठीशी घालून डावपेची खेळी खेळू नये,म्हणजे झाले!नाही तर या आगीच्या धगधगीत संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची जाण ठेवण्याबरोबरच सुजाण अधिकाऱ्यांनी या आगीच्या धगधगीची झळ आपल्याला बसणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे झाले.नाही तर दुसऱ्याला वाचविण्याच्या नादात आपणच अडचणीत येऊ नये हिच माफक अपेक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here