आशाताई बच्छाव
माता रत्नेश्वरी देवी वडेपुरी ते काळेश्वर विष्णुपुरी पालखी सोहळा पदयात्रा दिंडीत सहभागी होण्याचे मंदिर संस्थानचे आवाहन२१ ऑगस्ट रोजी निघणार पालखी पदयात्रा
लोहा/प्रतिनिधि
अंबादास पाटील पवार
तालुक्यातील जाज्वल्य श्री. माता रत्नेश्वरी देवीची सर्वदूर ख्याती असल्याने येथे दैनंदिन हजारों भाविक दर्शनासाठी येतात. दसरा महोत्सव कालावधीत येथे दहा दिवस यात्रे दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तर श्रावण मासातील पहिल्या सोमवारी माता रत्नेश्र्वरी देवीची पादुका असलेली पालखी पदयात्रा मागील सहा वर्षांपासून वडेपुरी ते विष्णुपुरी दरम्यान काढली जाते. यंदा दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता माता रत्नेश्वरी देवीची पादुका असलेली पालखी पदयात्रा वडेपुरी रत्नेश्र्वरी देवी पासून विष्णुपुरी येथील काळेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. सदरील सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन माता रत्नेश्वरी देवी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे
जिल्हाभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत सुप्रसिद्ध तसेच जाज्वल्य देवस्थान असलेली वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी देवी गावालगत उंच पर्वत डोंगरावर विसावली असून जिल्हाभरातून दैनंदिन शेकडो भाविक भक्त हे माता रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात. दसरा मोहत्सवा दरम्यान तर नवरात्रोत्सव सोहळ्यात रत्नागिरी गडावर मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. माता रत्नेश्वरी देवी रत्नागिरी गडावरून दररोज विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिरात जावून पूजा अर्चना करण्यासाठी जात असल्याची अख्यायिका असल्याने मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षी श्रावण मासातील पहिल्या सोमवारी मातेच्या पादुका असलेली पालखी पदयात्रा प्रभात समयी निघते. यावर्षी दि. २१ ऑगस्ट रोजी पहिल्या श्रावण सोमवार निमित्त सकाळी ६ वाजता सदरील पदयात्रा मौजे वडेपुरी येथून प्रारंभ होऊन जनापुरी, वाडीपाटी, विद्यापीठ कमान मार्गे विष्णुपुरी येथील काळेश्वर महादेव मंदिरात दुपारी १२ वाजता पोहांचणार असून पूजा, तीर्थप्रसाद, भोजन कार्यक्रम आटोपून सदरील पदयात्रा दुपारी २ वाजता काळेश्वर येथून परत श्री नानकसर गुरुद्वारा, झरी मार्गे सायंकाळी ६ वाजता वडेपूरी येथील रत्नेश्वरी गडावर पोहंचनार आहे.
सदरील पदयात्रेत जिल्ह्यासह तालुक्यातील धनगरवाडी, डेरला, झरी, ढाकणी, किवळा, वडगांव, टेळकी, हरबळ, सोनखेड, दगडगांव, जानापुरी, खरबी, बामणी, मोहनपुरा, पिंपळगांव, मर्कड, कल्हाळ, मुसलमानवाडी, विष्णुपुरी सह पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी बहुसंख्येने पालखी पदयात्रा सोहळ्यात सहभागी व्हावे. असे आवाहन मंदिर विश्वस्त संस्थान समिती, वडेपुरी ग्रामपंचायत कार्यालय व वडेपुरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.