Home सामाजिक काळाची गरज आहे बाप समजावून घेणे.. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानातून….

काळाची गरज आहे बाप समजावून घेणे.. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानातून….

91
0

आशाताई बच्छाव

IMG-20230820-WA0028.jpg

काळाची गरज आहे बाप समजावून घेणे..
वसंत हंकारे यांच्या व्याख्यानातून….
लेकरांनों आम्ही प्रेमाच्या विरोधात कधीच नाही पण तुमच्या प्रेमाला तर दर्जाच उरला नाही.. प्रेमामध्ये सात्विकता नाही प्रेमामध्ये वास्तवता नाही.. मुलाची निवड कशी करावी.. हे ही तुम्हाला कळत नाही ??.. मुलगा स्वाभिमानी आहे का ?? तो कमवतो का?? तो निर्व्यसनी आहे का ??त्याच्यावर चांगले संस्कार आहेत का?? तो माझ्या आई-वडिलांना मानसन्मान देईल का ??भविष्यामध्ये तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील का??.. याचा विचार न करता फक्त शारीरिक आकर्षण म्हणून तुम्ही पळून जातात.. लेकिंनो तुम्हाला फसवलं जातंय.. कारण आई-वडिलांच्या तोंडावर थुंकून निघून जाणं याला कधीच प्रेम म्हणत नाहीत.. तुझ्यावर जो प्रेम करतो त्याला सांग वाघासारखा माझ्या बापा समोर उभा रहा.. आणि माझा हात माग.. आणि तशी पात्रता तू कमाव ..स्वतःच्या मनगटावर आर्थिक सामाजिक सक्षमता तुला येऊ दे.. मग माझ्या बापाकडे माझी मागणी कर.. त्यावेळेला एक मुलगी म्हणून मी तुझ्याही पाठीशी उभी असेल.. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाला हे निक्षून सांगा.. पण असं रातोरात अजिबात पळून जाऊ नका.. बाप ही सध्या बदलतोय.. तो फक्त आणि फक्त लेकीचाच विचार करतोय.. तो नक्की तुमच्या पाठीशी उभा राहील ..पण जेव्हा तुमचं प्रेम सामर्थ्य शील संस्कारशील वास्तव असेल तेव्हाच.. तू निवडलेला मुलगा वाघासारखा संघर्ष करणारा असेल तेव्हाच.. आणि यातलं तुला काहीच कळत नसेल तर फक्त मला एकदा ऐक.. बाप समजावून घेताना बाप समजावून घेताना.. संकलन-राजेंद्र पाटील राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here