Home नाशिक मालेगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या (डि.एन.ई) अध्यक्षपदी दिनेश जाधव तर सचिवपदी विनायक सुर्यवंशीची...

मालेगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या (डि.एन.ई) अध्यक्षपदी दिनेश जाधव तर सचिवपदी विनायक सुर्यवंशीची निवड !

301
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230727-WA0012.jpg

मालेगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या (डि.एन.ई) अध्यक्षपदी दिनेश जाधव तर सचिवपदी विनायक सुर्यवंशीची निवड !
मालेगांव,(आंशूराज पाटील राऊत प्रतिनिधी)- मालेगांव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या (डि.एन.ई) अध्यक्षपदी दिनेश शिवाजीराव जाधव यांची तर सचिवपदी विनायक पोपटराव सुर्यवंशी यांची निवड ग्रामसेवक संघटनेच्या झालेल्या बैठकीत बहुमताने करण्यात आली.
दिनांक २१ जुलै रोजी मालेगांव पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस बहुसंख्य ग्रामसेवक बांधव व भगिनी उपस्थित होत्या, सर्वप्रथम ग्रामसेवक संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष कैलास नाना वाकचौरे यांनी आढावा बैठक घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.तदनंतर ग्रामसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या जिल्हास्तरावरुन सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.उर्वरीत कार्यकारीणी घोषित करण्याचे अधिकार नवनिर्वाचीत अध्यक्ष व सचिव यांना देण्यात आले.यावेळी रविंद्र शेलार मामा जिल्हा सरचिटणीस,प्रमोद ठाकरे चेअरमन नाशिक जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था,बापूसाहेब अहिरे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना प्रसिध्दी प्रमुख,केशवराव इंगळे जिल्हा कायदेशीर सल्लागार ग्रामसेवक संघटना,दिलीप निकम संस्थापक मालेगांव ग्रामसेवक सहकारी पतसंस्था,विश्वनाथ तलवारे जिल्हा ग्रामसेवक संघटना कार्याध्यक्ष,रंगनाथ कदम अध्यक्ष येवला तालुका ग्रामसेवक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचीत कार्यकारीणीची निवड करण्यात आली त्यात मालेगाव ग्रामसेवक संघटनेचे नवनिर्वाचीत पदाधिकारी पुढीलप्रमाणे दिनेश शिवाजीराव जाधव अध्यक्ष,विनायक पोपटराव सुर्यवंशी सचिव,भास्कर निंबा पाटील कार्याध्यक्ष,रमेश डि.ध्यानध्यान मानद अध्यक्ष ,सुरीतराम भागा शिरोळे उपाध्यक्ष,रविंद्र परशराम देवरे सहसचिव,श्रीमती सुप्रिया प्रकाश वडगे महिला उपाध्यक्ष,श्रीमती अश्विनी रामदास पवार महिला सहसचिव,घनश्याम सुरेश सोनवणे कोषाध्यक्ष,दिनेश रमेश अहिरे संघटक,कृष्णा संतोष जाधव कायदेशीर सल्लागार,बापू केदू भामरे कायदेशीर सल्लागार ,स्वप्नील बापू बच्छाव प्रसिध्दीप्रमुख आदी पदाधिका-यांची निवड यावेळी करण्यात आली.नुतन कार्यकारीणी पदाधिका-यांचा सत्कार पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी थोरात,बच्छाव,महाले,राजबंशी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.तर सुत्रसंचलन हेमंत शिरसाठ यांनी केले.सभागृहात सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.श्री.थोरात साहेब यांनी संघटना कशी वाढवावी आणि सगळ्या ग्रामसेवकांनी कसे संघटीत रहावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

Previous articleराज्य सरकारने कांद्याला जाहिर केलेले अनुदान
Next articleमालेगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या (डि.एन.ई) अध्यक्षपदी दिनेश जाधव तर सचिवपदी विनायक सुर्यवंशीची निवड !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here