Home अमरावती कुलगुरु डॉ येवले भारतीय विद्यापीठ संघाच्या आस्थापना समितीवर; अमरावती विद्यापीठ ला मिळाला...

कुलगुरु डॉ येवले भारतीय विद्यापीठ संघाच्या आस्थापना समितीवर; अमरावती विद्यापीठ ला मिळाला बहुमान.

65
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230706-214009_WhatsApp.jpg

कुलगुरु डॉ येवले भारतीय विद्यापीठ संघाच्या आस्थापना समितीवर; अमरावती विद्यापीठ ला मिळाला बहुमान.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा
पी.एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची दिल्ली येथील भारतीय विद्यापीठ संघाच्या (असोशियन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी ए आय यु) आस्थापना समितीवर निवड झाली आहे. या समितीवर ते एक वर्षासाठी अर्थात घेऊन २०२४ पर्यंत कार्यरत राहतील भारतीय विद्यापीठ संघाच्या महासचिव डॉ. पंकज मित्तल यांचे विद्यापीठ ला नुकतेच एक पत्र प्राप्त झाले असून त्या पत्रामध्ये आपल्या अनुभवाचा कार्याचा तसेच मार्गदर्शनाचा लाभ विद्यापीठ संघाला होईल असे नमूद करून सदस्य पद स्वीकारावे असे म्हटले आहे.डा. येवले यांना आतापर्यंत पाच विद्यापीठ कुलगुरू म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्या अनुभवाचा फायदा देशभरातील इतर विद्यापीठ नाही करून देण्याची संघाची मनीषा आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या पाच विद्यापीठ चे कुलगुरू म्हणून पदभार सामान्य अनुभव त्यांच्याकडे आहे. अशा प्रकारचा अनुभव असलेले बहुधा राज्यातील ते एकमेव कुलगुरू असावे असे शिक्षण तज्ञांचे निरीक्षण आहे. त्यांनी यापूर्वी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष पद भूषवले असून महात्मा गांधी हिंदी राष्ट्रीय विद्यापीठ राष्ट्रपती सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठ मध्ये अनेक विद्यार्थी हीतार्थ योजना राबविल्या. शैक्षणिक विकासामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठचे कार्य अग्रेसर आहे. विद्यापीठ च्या सर्व परीक्षा चे निकाल वेळेत लागले आहेत. या सर्व बाबीसाठी कुलगुरू डॉक्टर येवले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व नेतृत्व यशस्वी ठरत आहे. कुशल शैक्षणिक व प्रशासकीय नेतृत्व लाभलेले डॉक्टर येवले यांनी बोर्ड ऑफ स्टडीचे नामनिर्देशन लवकरात लवकर करून विद्वत परीक्षेचे घटने केले आहे. त्यांच्या निवळीबद्दल विद्यापीठचेप्र कुल गुरु डा. प्रसाद वाडेगावकर, कुल सचिव डॉ. तुषार देशमुख व्यवस्थापन परिषद सदस्य विविध प्राधिकरणीचे सदस्य विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख अधिकारी शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Previous articleशिक्षण धोरणात जलद सुधारणा करणे ही आजच्या काळाची मागणी आहे*
Next articleदत्तोपंत पा. पोहेकर यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here