Home Breaking News 🛑 मराठी भाषा दिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राज साम्राज्य प्रतिष्ठान...

🛑 मराठी भाषा दिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राज साम्राज्य प्रतिष्ठान 🛑

93
0

🛑 मराठी भाषा दिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राज साम्राज्य प्रतिष्ठान 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 04 मार्च : ⭕ मराठी भाषा दिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राज साम्राज्य प्रतिष्ठान, बोरीवली (रजि.) चे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री नयन प्रदीप कदम मनसे सरचिटणीस (महाराष्ट्र राज्य), व प्रमुख सल्लागार श्री प्रसाद कुलापकर मनसे विभाग अध्यक्ष (बोरीवली विधानसभा) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली.

प्रथम पारितोषिक गजानन पॅकर्स (मालाड) व
द्वितीय पारितोषिक पोयसर इलेव्हन (कांदिवली)

सदर स्पर्धेस, मनसे विभाग अध्यक्ष श्री प्रसाद कुलापकर, प्रभाग क्रमांक ९ चे शाखाध्यक्ष महेश नर, मनकासे चिटणीस श्री दिनेश चव्हाण, मनवासे चिटणीस श्री गणेश गिजम, प्रभाग क्रमांक ९ चे माजी शाखाध्यक्ष श्री योगेश भोसले यांची उपस्थिती हि लाभली. विजेते व उपविजेता खेळाडूंचे सन्मान मराठी सिने अभिनेते मा. श्री अविनाश नारकर, प्रतिष्ठान चे सल्लागार मनसे माजी उपविभाग अध्यक्ष श्री विश्वास मोरे, मनसे प्रभाग क्रमांक १८ चे शाखा अध्यक्ष श्री सुनील जाधव, मनसे प्रभाग क्रमांक १६ चे शाखा अध्यक्ष श्री प्रकाश माने, एम फिटनेस चे मालक श्री मंगेश सावंत, राज साम्राज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री संतोष विश्वासराव यांच्या हस्ते देण्यात आले.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here