आशाताई बच्छाव
भगुर चा उड्डाणपूल उजेडाच्या प्रतिक्षेत
सुदर्शन बर्वे (भगुर प्रतिनिधी)
:- भगूर शहर येथे नुतन विद्या मंदिर, रेल्वे गेट नंबर ८५ वर भगूर ते विजयनगर, राहूरी, पाढुर्ली , विंचुरी अशा अनेक खेडे पाडे जोडनारा उड्डाणपुल स्थानिक खासदार निधीतून बांधन्यात आला परंतू या वर पथदिप नसल्याने आजही रात्रीच्या वेळेस उजेडाच्या प्रतिक्षेत आहे. त्याचे झाले असे की गेले तीन वर्षापासुन बांधून पूर्ण झाला व तो नागरिकांना ये-जा करण्यासाठी खुला करण्यात आला पण रात्रीच्या वेळी या पुलावर अजून ही पथदिप ( स्टीट लाईट) नसल्याने यावरून ये-जा करणे गैरसोयीचे झाले असून या चा त्रास रात्रीच्या वेळी पाई प्रवास करणारा अबाल वृद्ध, महिला वर्ग तसेच नागरिकांना होत असून त्यांना भितीच्या वातावरणात पाई चालावं लागत कारण रात्रीच्या वेळेस आजची परिस्थिती पाहता महिला वर्ग, अबाल वृद्ध यांची लूटमार व महिला वर्गाला छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या साठी छावणी परिषद देवळाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील याचा पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक तसेच सिन्नर येथे केला असून ,स्वराज पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना देखील गेल्या २-३महिन्या पासून याचा निवेदन देऊन पाठपुरावा करत आहे पण बांधकाम विभाग मात्र या कडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. बांधकाम विभागाकडे या बाबत विचारले असता निधी अभावी पथदिप नह
नाही असे सांगत आहे मग पुल बांधकाम वेळी शासनाने या साठी निधी मंजूर केला नाही का? असा प्रश्न भगुर तसेच पंचक्रोशीतील नागरिक विचारत आहे आणि या मुळे नागरिक आता या उड्डाणपूला ला नक्की वाली कोण या प्रतीक्षेत आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन जर महिलांन सोबत काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तरी बांधकाम विभागाने लवकरात लवकर उड्डाणपुलावर पथदिप बसवावे ही मागणी जोर धरू लागली आहे