Home उतर महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दयनीय अवस्थेबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव शिंदे यांच्यावर आमरण...

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दयनीय अवस्थेबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव शिंदे यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ.

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20230704-WA0067.jpg

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दयनीय अवस्थेबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव शिंदे यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ.

सोनई प्रतिनिधी :- कारभारी गव्हाणे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथे शाळेच्या सभोवताली मोठाले खड्डे दारूच्या बाटल्या बाटल्यांच्या काचा,ठेकेदाराकडून पडलेल्या सिमेंटच्या जुन्या गोण्या,गवत अशा अवस्थेत शाळेसमोर मुलांचा वावर असतो.

त्यामुळे मुलांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे, शौचालय नाही मुताऱ्या नाही मुलांना खेळण्यासाठी शाळेसमोर जागा नाही.

शाळेच्या वर्गात पावसाचे पाणी शिरते ,ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे .

वेळोवेळी विनंती करूनही या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते त्यामुळे अखेर खेडले परमानंद येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध करत दिनांक 5/7/2023 आमरण उपोषणाचा पवित्र घेतला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद या ठिकाणी गरीब व दलित कुटुंबातील मुले आहे सधन कुटुंबातील सर्व मुले खाजगी शाळेत आहे त्यामुळे गाव पुढाऱ्यांचे या गोष्टीकडे लक्ष नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

मायबाप सरकार या गरीब विद्यार्थ्यांना न्याय देणार का?

असा प्रश्न उपोषकर्ते संभाजी शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

Previous articleगुरू शिवाय जीवनात कोणताही मार्ग नाही भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन
Next articleभगुर चा उड्डाणपूल उजेडाच्या प्रतिक्षेत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here