Home नाशिक नाशकात लाचखोरीने गाठला कळस… आणखी एक मोठा मासा गळाला… तब्बल ४० लाखांची...

नाशकात लाचखोरीने गाठला कळस… आणखी एक मोठा मासा गळाला… तब्बल ४० लाखांची लाच प्रकरणी दिंडोरी प्रांत जाळ्यात…

145
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0039.jpg

नाशकात लाचखोरीने गाठला कळस… आणखी एक मोठा मासा गळाला… तब्बल ४० लाखांची लाच प्रकरणी दिंडोरी प्रांत जाळ्यात…

भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नाशिक:- नाशिकमध्ये लाचखोरीने कळस गाठला आहे. गेल्या सहा महिन्यात अनेक लाचखोरांवर कारवाई झाली आहे. त्यात मोठ्या धेंडांचाही समावेश आहे. आताही एक मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अडकला आहे. दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) निलेश अपार हा तब्बल ४० लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या सापळ्यात सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रचंड लाचखोरी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आठवड्याला किमान २ जण तरी लाच घेताना पकडले जात आहेत. एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात जोरदार कारवाई आहे. त्यामुळे तक्रारदारांचे प्रमाणही वाढत असून लाचखोर दिवसागणिक समोर येत आहेत. आतापर्यंत जिल्हा उपनिबंधक, शिक्षणाधिकारी यासारखे बडे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. आताही महसूल विभागातील क्लास वन अधिकारी एसीबीच्या गळाला लागला आहे.दिंडोरीचा उपविभागीय अधिकारी निलेश अपार हा एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. एका खाजगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी अपार याने तब्बल ४० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याबाबत एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि अपार हा ४० लाखांची लाच घेताना सापडला आहे. याप्रकरणी एसीबीच्या पथकाकडून अपार याची चौकशी सुरू असून दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.एसीबीच्या या मोठ्या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय महसूल यंत्रणाही अतिशय सतर्क झाली आहे. आतापर्यंत शिक्षण, पोलिस अशा विविध विभागात सापळे यशस्वी होत होते. आता महसूल विभागातही लाचखोरी बोकाळल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याप्रकरणी एसीबीकडून लवकरच मोठी माहिती सादर केली जाणार आहे.

Previous articleधार्मिक सोहळ्यातील पोलिसांचा हस्तक्षेप कमी करा, बंदोबस्ताच्या नावाखाली होतोय भाविकांना त्रास
Next articleतलाठी पदभरतीला तात्काळ स्थगिती देऊन ओबीसी समाजावर झालेला अन्याय दूर करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here