Home पुणे धार्मिक सोहळ्यातील पोलिसांचा हस्तक्षेप कमी करा, बंदोबस्ताच्या नावाखाली होतोय भाविकांना त्रास

धार्मिक सोहळ्यातील पोलिसांचा हस्तक्षेप कमी करा, बंदोबस्ताच्या नावाखाली होतोय भाविकांना त्रास

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0036.jpg

धार्मिक सोहळ्यातील पोलिसांचा हस्तक्षेप कमी करा, बंदोबस्ताच्या नावाखाली होतोय भाविकांना त्रास
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
पिंपरी : धार्मिक सोहळ्यांमध्ये पोलीस बळाचा अतिरेक टाळा बंदोबस्ताच्या नावाखाली होतोय भाविकांना त्रास होत आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सोहळ्याला गालबोट लागेल आणि राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.
संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा आटोपशीर आणि वेळेत पार पडावा, याकरिता श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानने लागू केलेल्या नव्या नियमावलीमुळे मंदिर प्रवेशावरून हा वाद घडला. पालखी प्रस्थान सोहळ्याला काहीसा कालावधी बाकी असताना माऊली मंदिराबाहेर हा प्रकार घडल्याने वारकरी संघटनांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. तर या घटनेच्यानिमित्ताने पोलिसांच्या भूमिकेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
वारकरी सांप्रदायाची देहू-आळंदी ही तीर्थक्षेत्रे जगभरात प्रसिद्ध आहेत. आळंदी तीर्थक्षेत्री आषाढी व कार्तिकी या दोन वाऱ्यांना राज्यभरातील लाखो भाविक हजेरी लावतात. आळंदीतील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या दोन्ही वाऱ्यांना लाखोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या भाविकांचा ताण नगरपरिषद व पोलीस प्रशासनावर पडत असतो. आळंदीत येणाऱ्या प्रत्येकाला मंदिरात स्पर्श दर्शनाची आस असते. या दोन्ही सोहळ्यांमध्ये दिवसेंदिवस पोलीस बळाचा अतिरेक होत असल्याचे चित्र आहे. माऊली मंदिर, परिसर व वारकऱ्यांच्या मुक्कामाच्याठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलीस बंदोबस्त आवश्‍यक आहे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही आणि असूही नये. मात्र, या दोन्ही सोहळ्यांदरम्यान पोलीस बंदोबस्ताच्या नावाखाली होत असलेल्या अरेरावीमुळे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत.
गाभाऱ्यातही पोलीस
गाभाऱ्यातही पोलीस
वास्तविक पाहता, या दोन्ही सोहळ्यांकरिता मंदिर, मंदिर परिसर व आळंदीतील मुख्य रस्त्यांवर शेकडो सीसीटीव्ही नजर ठेवून असतात. तर या दोन्ही सोहळ्यांच्या मुख्य दिवशी समाधी गाभारा, वीणा व पंखा मंडपात असणारी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त खरोखरच आवश्‍यक आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करणारी ही संख्या असते. ऑन ड्युटी असल्याने देवस्थानचे पदाधिकारीदेखील याबाबत फारशी कुरबुर न करता पोलीस प्रशासनाशी जुळवून घेत आहेत. तरीदेखील समाधी गाभाऱ्यातील पोलिसांची मोठी संख्या भाविकांसाठी निश्‍चितपणे अडचणीची ठरत आहे. मंदिर परिसर व रस्त्यावर जरूर पोलीस बळ तैनात करा, समाधी गाभाऱ्यात गरज काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here