Home पालघर मोखाडा तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा अन्यथा आंदोलन करू? -विठ्ठल चोथे पाटील

मोखाडा तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा अन्यथा आंदोलन करू? -विठ्ठल चोथे पाटील

105
0

आशाताई बच्छाव

IMG-20230616-WA0054.jpg

मोखाडा तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा अन्यथा आंदोलन करू? -विठ्ठल चोथे पाटील

मोखाडा,(युवा मराठा न्युज नेटवर्क)

तालुक्यातील तहसील कार्यालय येथे कर्मचारीच नसल्यामुळे नागरिकांची हेळसांड बघायला मिळते. योग्य वेळेवर कामे न झाल्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत. तहसील कार्यालयात एकूण मंजूर १४ पदांपैकी ७ पदे भरलेली आहेत तर ७ पदे रिक्त आहेत. त्या ७ भरलेल्या पदांपैकी ५ पदे सध्या स्थितित कार्यरत आहेत तर दोन पदांपैकी १ महसूल सहाय्यक निलंबित तर १ कर्मचारी बदली होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे वर्ग करण्यात आले आहे. यामुळे येथील उर्वरित ५ कर्मचारी यांना ३ते४ टेबल ची कामे करावे लागतात. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत ही बाब भाजपा तालुका अध्यक्ष यांना समजताच तत्काळ तहसील कार्यलयास भेट देऊन तेथील स्थिति जाणून घेतली व तात्काळ पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. तसेच दि.१२ जून पासून कार्यालयात लाइट उपलब्ध नाही,लाईट ये-जा करते तर ऑनलाइन कामास व्यत्यय येत असल्याचे तेथील कर्मचारी यांनी सांगितले . तसेच लवकरात लवकर कार्यलयात लाइट जनरेटर/इंनवेटर अश्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा ईशा रा भाजपा तालुका अध्यक्ष विठ्ठल चोथे पाटिल यांनी दिला आहे.

Previous articleजि.प.मुख्याध्यापक श्रीमान,भालचंद्र कुवर यांना निसर्ग मित्र समितीचा छत्रपती महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर
Next articleशासन आपल्या दारी उपक्रम चळवळ म्हणून राबवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here