Home उतर महाराष्ट्र जि.प.मुख्याध्यापक श्रीमान,भालचंद्र कुवर यांना निसर्ग मित्र समितीचा छत्रपती महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर

जि.प.मुख्याध्यापक श्रीमान,भालचंद्र कुवर यांना निसर्ग मित्र समितीचा छत्रपती महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230616-WA0044.jpg

जि.प.मुख्याध्यापक श्रीमान,भालचंद्र कुवर यांना निसर्ग मित्र समितीचा छत्रपती महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर
वासखेडी/धुळे,(दिपक जाधव ब्युरो चीफ) – येथील वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे देण्यात येणारा वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी २०२३ या वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय निसर्ग मित्र समितीचा पुरस्कार वासखेडी येथील गोकुळनगरी जि.प.शाळेचे माझी मुख्याध्यापक श्री,भालचंद्र दामु कुवर यांना जाहीर झाला असुन याबाबत निसर्ग मित्र समिती धुळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त प्रेमकुमार अहिरे साहेब धुळे जिल्हाध्यक्ष श्री,डी,बी,पाटील सर,यांचे पत्र श्री कुवर यांना प्राप्त झाले असुन,श्री,भालचंद्र कुवर यांनी वासखेडी आपल्या जन्मभुमीत गावातील बाहेर असलेल्या तरूणांना सोबत घेत ग्रामविकास मंचची स्थापना करून अनेक वृक्ष सेवकांनी वृक्ष देणगी देत ३५०वृक्षांची लागवड करत संगोपण देखील केले आहे,या कार्याची दखल घेऊन निसर्ग मित्र समितीने सदरील पुरस्कार हा श्री,कुवर यांना जाहीर केला आहे.५जुन पर्यावरण दिनानिमित्त हा पुरस्कार निसर्ग मित्र समितीचा वर्धापण दिनी १८जुन रोजी धुळे येथे सपत्निक मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रधान करण्यांत येणार आहे, यासाठी परीसरातुन शंकरजी एज्यु,सोसयटीचे संस्थापक अध्यक्ष मा,दादासाहेब विठ्ठलराव ठाकरे,उपाध्यक्ष बापुसो,बी,पी,पाटील,संचालक मंडळ तसेच ग्रामविकास मंच चे पदाधिकारी,मं.गां.वि.वासखेडी च्या मुख्याध्यापिका सौ,के,एस,गायकवाड मॅडम व शिक्षकवृंद,जि.प.शाळा वासखेडी च्या मुख्याध्यापिका सौ,संगिता पाटील व शिक्षक तसेच रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा ग्रां.पं.सदस्य पत्रकार दिपकभाऊ जाधव व ग्रा मस्तानच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करत अभिनंदन ही केले

Previous articleकिनवट जवळील आदिवासी सावरगावने अनुभवली शासन आपल्या दारीची प्रचिती
Next articleमोखाडा तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा अन्यथा आंदोलन करू? -विठ्ठल चोथे पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here