Home पालघर मोखाडयातील ९ घरकुलांना वर्षभरापासुन दुसरा हफ्ता नाही पावसाच्या तोंडावर कामे रखडली, घरकुल...

मोखाडयातील ९ घरकुलांना वर्षभरापासुन दुसरा हफ्ता नाही पावसाच्या तोंडावर कामे रखडली, घरकुल लाभार्थी झिजवतायत कार्यालयाच्या पायऱ्या

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20230614-WA0002.jpg

मोखाडयातील ९ घरकुलांना वर्षभरापासुन दुसरा हफ्ता नाही

पावसाच्या तोंडावर कामे रखडली, घरकुल लाभार्थी झिजवतायत कार्यालयाच्या पायऱ्या

प्रशासनाची तांत्रिक अडचण,लाभार्थ्यांच्या मुळावर

मोखाडा,(युवा मराठा न्युज नेटवर्क)
पाऊस आता उंबरठ्यावर आला असताना पावसाआधी डोक्यावर छप्पर असाव यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो अशावेळी शासनाकडून घरकुल मिळवून काम चालु असलेल्या तब्बल ९ घरकुलाना मे २०२२ पासून आजवर दुसराहफ्ता मिळालेला नाही यामुळे या लाभार्थ्यांना या पावसाआधी डोक्यावर छ्प्पर मिळेल कि नाही असा सवाल उपस्थित होत गेल्या वर्षभरापासुन प्रशासन तांत्रीक कारणे देत आहेत मात्र तुमच्या तांत्रिक अडचणीत आमची काय चुक असा सवाल लाभार्थी करीत आहेत.यामुळे या वर्षी तरी या लाभार्थ्यांना दुसरा हफ्ता मिळेल कि पुन्हा कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
शासनाकडून घरकुल योजनेसाठी एका लाभार्थ्यांला १ लाख २० हजार रुपये दिले जातात.यासाठी काम सुरू व्हायच्या आत पहिला हफ्ता म्हणून १५ हजार रुपये दिले जातात यानंतर लाभार्थानी काम सुरू करावयाचे असते यानंतर टप्प्या टप्प्याने म्हणजेच दुसरा हफ्ता म्हणून ४५ हजार,तिसरा फक्ता ४० हजार आणि शेवटचा हफ्ता म्हणून २० हजार रुपये असा हा निधी वर्ग केला जातो.मात्र तालुक्यातील ९ लाभार्थ्याना अशाच प्रकारे पहिला हफ्ता देण्यात आला यावर यांनी कामही सुरू केले मात्र यानंतर मे २०२२ पासून म्हणजे आज वर्षभर होवूनही दुसरा हफ्ताच जमा झालेला नाही यासाठी या लाभार्थ्यांनी कार्यालयांचे उंबरठे झिजवले तरीही यांना हि रक्कम मिळालेली नाहि.यामुळे शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमातुन योजना तात्काळ मंजूर करण्याच्या वल्गना करणाऱ्या शासनाकडून घरकुलाचा निधी द्यायला तब्बल एक वर्षांचा कालावधी लागणार असेल तर मात्र आशर्य व्यक्त होत आहे.
लाभार्थी जेंव्हाही यासाठी कार्यालयात येतात तेंव्हा त्यांनी वर्क कोड जनऱेट नाही वगैरे सारखी तांत्रिक कारणे दिली जातात शासनाच्या आणि प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीत लाभार्थ्यांची चुक काय असा सवाल उपस्थित होत आहे.यावेळी पंचायत समितीतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता आम्ही यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.यासगळ्यात मात्र पाऊस उंबरठ्यावर येवून ठेपला आहे.आणि घरावर छ्त नाहीयामुळे आम्ही कुठे राहायचे असाही सवाल लाभार्थी यांनी केला आहे आता जर

” शासन आपल्या दारी सारखा अतिशय स्त्युत उपक्रम सरकार राबवत आहेत मात्र घरकुला सारख्या योजनांत अशी दिरंगाई न पटणारी आहे याबाबत मी वेळोवेळी प्रशासनाला कागदोपत्री आणि तोंडी मागणी केलेली आहे.यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पालघर येथे येत आहेत त्यावेळी त्यांच्याशी याबाबत मी चर्चा करणार आहे आणि या लाभार्थ्यांना लवकर लाभा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे.
प्रदिप वाघ
उपसभापती पस मोखाडा

मे २०२२ ते जून २०२३ या वर्षाभरापेक्षाही अधिकच्या कालावधीतही जर शासनाकडून तांत्रिक अडचणीचे कारण सांगितले जात असेल तर ‘सरकारी काम आणि वर्षभर थांब’ या उक्तीची प्रचीती या प्रकरणात येत आहे.या वेळी गतीमान सरकार आणि शासन आपल्या दारी अशी गोंडस नाव देवून मिथे पाठ थोपटवुन घेण्याचा केविलवाणा प्रकार अधिकारी करीत आहेत मात्र अशा अनेक योजनांसाठी लाभार्थ्यांची होणारी हेळसांड सोयीस्कररीत्या विसरली जात असून निव्वळ वरुन कार्यक्रम आला म्हणून राबवायचा असाच प्रकार होत आहे.यामुळे हे मोखाडा तालुक्यातील जिते जागते प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर जायला हवे एवढेच काय तर शिंदे यांच्या उपस्थित होणाऱ्या योजना वाटपाच्या कार्यक्रमात जुन्याच लाभार्थ्यांना पुन्हा प्रमाणपत्र देवून फसविले जाणार असल्याची दाट शक्यता आहे.यामुळे पालघर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांनी याघटनेकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here