आशाताई बच्छाव
कांद्याला किमान १८०० रुपये हमीभाव द्यावा-कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे
परकीय व नगदी चलन मिळवून देणाऱ्या चांदवड तालुक्यातील मुख्य कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात सर्वाधिक कांदा पिकाचे घेणार चांदवड हा एक तालुका असून सद्यस्थितीत मिळत असलेल्या कवडीमोल भावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशा कंबरडे मोडले असून शासनाने किमान कांद्याला अठराशे रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.
चांगले उत्पन्न मिळेल या आशेने शेतकऱ्याने ६५ हजार रुपये खर्च करून चार महिन्यांत कांदा पिकवला. तीन बिघ्यात १२५० कि कांदा निघाला. बाजार समितीतील आडत्याने कांदा एक रुपया ३२ पैसे दि १३ तारखेला खरेदी केला.त्यात हमाली, तोलाई, गाडीभाडे आदींचा ८६ रुपये ४५ पैसे खर्च लागला.हे पैसे वजा हाेता, शेतकऱ्याच्या वाट्याला ८३७.५५ ₹ आले. त्यातही १५०० रुपयांचे ट्रॅक्टर भाडे गेले.बाजारात २० रुपये किलो दराने ग्राहकांना मिळणारा कांदा आडत्याने एक रुपये किलोने खरेदीने केल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणल्याचे समोर आले.चांदवड तालुक्यातील दुगाव येथील बाळू नंदू सोनवणे यांच्या कुटुंबातील सहा जणांची गुजराण ३.५ एकर शेतीवर होते. त्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही.त्यात चांगले उत्पन्न मिळणार या आशेने सोनवणे कुटुंबीयांनी दीड एकर शेतात म्हणजे ६० गुंठे शेतात ६५ हजार रुपये खर्च करून कांदा लागवड केली.यात दिवसरात्र सर्वांनी मेहनत करून चार महिन्यांत कांदा पिकवला. सध्या बाजारात २० रुपये किलाे दराने कांदा विक्री हाेत आहेत. त्यामुळे बाजार समितीत चांगला दर मिळेल या अपेक्षेने बाळू सोनवणे यांनी १३ मे रोजी चांदवड येथील बाजार समितीमधील फलके ट्रेडर्स यांच्या दुकानात नेला.त्या वेळी कांद्याचा लिलाव अवघा एक रुपया ३२ पैसे किलाेने झाला. त्यामुळे शेतकऱ्याला सात क्विंटल कांद्याचे ८३७ रुपये मिळाले. एकंदरीत सद्यस्थितीतील कांदा बाजार भावाचा विचार करता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आगामी पिकासाठी भांडवल आणायचे तरी कुठून? आणि उत्पादित मालाला खर्चाच्या तुलनेत बाजार भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हातबल झाला असून शासनाने वेळीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देऊन किमान हमी बाजार भाव जाहीर करावा, तरच कांदा उत्पादक शेतकरी यातून सावरू शकतो अन्यथा आत्महत्येचे लोण नाशिक जिल्ह्यात सुरू होण्यास वेळ लागणार नाही अशीच एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना १७०० ते १८०० रु. हमीभाव द्यावा शेतकऱ्याने जगायचे कसे हाच प्रश्न आहे सात क्विंटल कांद्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून तो पिकवून विक्री केला.त्यास केवळ एक रुपया ३२ पैसे किलाे दर मिळाला. शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे, याचे उत्तर शासनाने द्यावे. तसेच शेतकऱ्यांना १७०० ते १८०० रुपये हमीभाव द्यावा.
बाळू नंदू सोनवणे–दुगाव चांदवड