Home नांदेड तृणधान्याच्या महत्त्वासाठी जिल्हा परिषदेत भाकरी-ठेचातून बचतगटांच्या महिलांनी दिला संदेश

तृणधान्याच्या महत्त्वासाठी जिल्हा परिषदेत भाकरी-ठेचातून बचतगटांच्या महिलांनी दिला संदेश

172
0

आशाताई बच्छाव

IMG-20230127-WA0064.jpg

तृणधान्याच्या महत्त्वासाठी जिल्हा परिषदेत भाकरी-ठेचातून बचतगटांच्या महिलांनी दिला संदेश

▪️आहारातील तृणधान्यातून सुदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमार्फत विशेष मोहिम

– जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
नांदेड (जिमाका) :– इथल्या मातीच्या गुणधर्मानुसार व पर्यावरणातील विविधतेनुसार मानवी शरीराला पोषक मूल्य देणारे अनेक तृणधान्य निसर्गाने देऊ केलेले आहेत. अनेक पिढ्यांपासून आपण ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राजगीरा ही तृणधान्य खात आलो आहोत. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी याच आहारावर आपले आरोग्य उत्तम ठेवले. अलिकडच्या काही वर्षात आपला आहार शरीराला न मानवणाऱ्या गहू, तांदूळ, डाळी यांच्या वरेमाप वापरावर केंद्रीत केल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या मूळ सत्वाकडे तृणधान्याच्या आहारातून पोषक सात्विकतेचा संदेश गावोगावी पोहचावा या उद्देशाने तृणधान्य आहार चळवळीला बचतगटाच्या माध्यमातून व्यापक स्वरुप देता आले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद व माविमच्यावतीने जिल्हा परिषद आवारात तृणधान्याचे महत्त्व व्यापक व्हावे यासाठी ज्वारी, नाचणीच्या ताज्या भाकरी व ठेचा, हुरडा स्टॉलच्या माध्यमातून प्रातिनिधीक स्वरुपात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लहान व अर्धापूर येथील बचतगटाच्या महिलांनी जिल्हा परिषदेच्या आवारात नियोजीत ठिकाणी नाचणी व ज्वारीच्या चुलीवरील भाकरी, चटणी, ठेचा, हुरडा याची अपूर्व प्रातिनिधीक स्वरुपात मेजवानी दिली.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तृणधान्याचे आहारातील महत्त्व यावर संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा महोत्सव घेण्यात येऊन फास्टफूडकडे सरकत जाणाऱ्या आपल्या आहाराला आरोग्यवर्धक पोषक आशा स्लोफूड अर्थात तृणधान्याकडे वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

Previous articleविश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next articleसावरगाव पी. येथे प्रजासत्ताक दिन, पालक मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here