Home नांदेड आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल देगलूर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल देगलूर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0109.jpg

आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल देगलूर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था द्वारा संचलित आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल देगलूर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक प्राध्यापक सोनकांबळे मारोती लक्ष्मणराव तसेच आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुनंदा मॅडम, रूपाली अकुलवार मॅडम, प्रियंका मॅडम, दिव्या मॅडम, दंतुलवार मॅडम,शेख इसाक ,माथुरे ताई या सर्वांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल येथील अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये सार्थक , माहीम , अदिबा , समीक्षा,विकल्प ,आरुषी , अमृता,गौतमी ,सोहम ,कनिष्क देगलूरकर इ. विद्यार्थी भाषणात सहभागी झाले होते.यावेळी संस्थेचे संचालक प्राध्यापक सोनकांबळे सर यांनी भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाला. त्यानंतर भारतीय लोकांना आपल्या स्वतंत्र कायद्यांची आवश्यकता होती. ती उणीव 26 जानेवारी 1950 रोजी पुर्ण झाली. आणि भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. तेंव्हापासून तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते.याविषयी सखोल माहिती मांडली. त्याचबरोबर भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यामुळे भारतातील विविध धर्माचे लोक,विविध परंपरेतील समाज ,विविध जाती समुदाय,विविध भाषा, विविध वेशभूषा, विविध प्रांत, अशी भिन्नता असूनही आज आपला देश 74 वर्षानंतरही अत्यंत अभिमानाने, शांततेने, बंधुभावाने, एकात्मतेने, नांदतो. तसेच लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी जी भावना, मानसिकता, प्रगल्भता ,भारतीय समाजामध्ये आवश्यक होती ती बाब भारतीय राज्यघटनेने पुर्ण केली आहे .त्यामुळे भारतातील संपूर्ण भारतीय समाज हा अत्यंत शांततेने,सलोख्याने, एकात्मतेने नांदतो आहे .विविधतेतून एकता, समता, स्वातंत्र्य ,बंधुता ही सर्व मूल्ये भारतीय समाजामध्ये अत्यंत खोलवर भारतीय राज्यघटनेमुळे रुजलेली आहेत. त्यामुळे भारतातील संपूर्ण समुदाय हा अत्यंत नम्रपणे, आपुलकीने आपले जीवन व्यतीत करत असतो या सर्व बाबीचे श्रेय भारतीय राज्यघटनेला जाते. आणि ही भारतीय राज्यघटना निर्माण करण्याचे महान, मोठे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या घटना समितीने केलेले आहे.ही बाब अत्यंत महत्वाची व भारतीय लोकांच्यासाठी अभिमानाची आहे. याविषयी सखोल अशी माहिती अध्यक्षीय भाषणातून मांडली. तसेच यावेळी अनेक पालकांनी आपली उपस्थिती लावली होती. हा कार्यक्रम अत्यंत आनंदात उत्साहात मुलांचे गुणगान करून वीगोड कौतुक करून त्यांना विवीध स्पर्धेत सहभागी होऊन जो यश संपादन केलेत अशा सर्व विध्यार्थ्यांना व सहभागी झालेल्या विद्यार्थ्याना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रियंका मॅडम यांनी केले तसेच आभार दंतुलवार मॅडम यांनी केले.

Previous articleजिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ
Next articleहात से हात जोडो अभियानास मुखेड तालुक्यातुन उंद्री नगरीतून प्रारंभ.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here