Home नांदेड हात से हात जोडो अभियानास मुखेड तालुक्यातुन उंद्री नगरीतून प्रारंभ.

हात से हात जोडो अभियानास मुखेड तालुक्यातुन उंद्री नगरीतून प्रारंभ.

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0097.jpg

हात से हात जोडो अभियानास मुखेड तालुक्यातुन उंद्री नगरीतून प्रारंभ.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
देशाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतुन काँग्रेस पक्षाच्या वतीने हात से हात जोडो अभियान दिनांक 26/1/2023 रोजी नांदेड जिल्हात मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली.मुखेड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार हणमंतराव पा बेटमोगरेकर साहेब, माजी आमदार अविनाश जी घाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकलारा सर्कलमधुन उंद्री प.दे. या गावातुन मोठ्या उत्सवाच्या वातावरणात सुरुवात करुन मा. जि. प. अध्यक्ष दिलीपराव पा बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभियानास सुरुवात करुन राहुलजी गांधी यांचे विचार तळागाळापर्यत पोहचविण्याचे कार्य काँग्रेस पक्षाच्या मार्फत हात से हात जोडो अभियानद्वारे करण्यासाठी मुखेड तालुका काँग्रेस कमिटी सज्ज झाली आहे.
देशात बेरोजगारी दिवसेदिवस वाढत चालली आहे. छोटे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर यांचे भाव तर गगनाला भिडले आहेत. शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला गेला असून देशाची संपत्ती ही मोजक्या उद्योगपतींच्या खिशात जात आहे. अनेक संकटातून आज भारत देश आर्थिक संकटातुन जात आहे अशा विधायक परिस्थितीमुळे लोकशाहीसुद्धा संकटाच्या विळख्यात सापडत आहे अशा परिस्थितीत देशाला फक्त राहुल गांधीच वाचवु शकतात.असे वक्तव्य मा.जि. प. अध्यक्ष दिलीपराव पा बेटमोगरेकर यांनी व्यक्त केले.
तर मा. तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पा मंडलापुरकर,व प्रवक्ते दिलीप सावकार कोडगिरे, तालुकाध्यक्ष राजीव पा रावणगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर आकाश पा उंद्रीकर यांनी सुत्रसंचालन व प्रस्ताविक केले.सुरुवातीस ध्वजारोहन तद्नंतर घरोघरी जाऊन राहुलजी गांधी यांच्या विचारधारेचे व जुमलेबाज सरकार विरोधी हॅन्ड पांम्पलेटचे वाटप करत महात्मा गांधी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली.
यावेळी चेअरमन माधवराव पा वडजे,मा सरपंच राजु पा चोंडीकर ,मा सरपंच नामदेव पा जाहुरकर,महासचिव आकाश पा उंद्रीकर,चेअरमन बालाजी पा बसापुरे चोंडी,मा सरपंच पांडुरंग कंधारे,चेअरमन रुपेश पा लिंगापुरकर,बालाजी देशमुख भाटापुरकर,आनंदराव पा हसनाळकर,युवा नेते दिनेश अप्पा आवडके,महासचिव संदिप पा नेवळीकर,युवा कार्याध्यक्ष मोहशिन भाई कोतवाल,सरपंच संदीप घाटे तुपदाळ,मधुकर पा चोंडीकर, पत्रकार जैनोदिन साब पटेल, मनोज बिरादार व उंद्री नगरिचे सरपंच वनिताताई गन्लेवार,आदी असंख्य मान्यवराच्या उपस्थितीत अभियानास सुरुवात करण्यात आली. एकलारा सर्कलमधील असंख्य काँग्रेस पदाधिकारी, उंद्री नगरीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleआयडियल इंग्लिश मीडियम स्कूल देगलूर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next articleत्रिकूट दुर्घटनेत बचाव मोहिमेचे नेतृत्व करणारे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here