आशाताई बच्छाव
राजोली फाल येथे क्रिकेट सामने संपन्न
सावली/गडचिरोली, ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क )
येथूनच जवड असलेल्या राजोली फाल येथे विर शिवाजी क्रिकेट वलंब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते
या सामन्यात 14 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा त पहिले बक्षीस माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवर यांचे कडून 21,000 हजार रुपये ठेवण्यात आले होते तर दुसरे बक्षीस निखिल सुरमवार यांचे कडून देण्यात आले बोथली येथील युवा सरपंच टिकेश नरेंड्डीवार, यांचे कडून 7000, रुपये देण्यात आले
राजोली फाल हे सावली तालुक्यातील एक लहानसे गाव आहे या गावात वेगवेगड्या स्पर्धा घेण्यात येतात
आज सावली तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे यांचे हस्ते विजेत्या स्पर्धकणा बक्षीस देण्यात आले यात प्रथम बक्षीस ऑल इज वेल क्रिकेट वक्लब मूल यांनी पटकविला तर दुसरे बक्षीस वीर शिवाजी क्रिकेट वक्लब राजोली फाल यांनी पटकविला तिसरे बक्षीस जे राजे क्रिकेट वक्लब राजोली फाल यांनी पटकविला
बक्षीस वितरण करते वेळी नितीन गोहने यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की, खेळबरोबर विध्यार्थी नि अभ्यासाकळे लक्ष देण्याची आवश्यक ता आहे आपला अमूल्य वेळ हा अभ्यासात विध्यार्थी नि घालवावा असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी या प्रसंगी केले
व्यासपीठावर माजी सरपंच शामराव पाटील बाबनवाडे, माधुरी कोरडे, सीमा वाकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदा बाबनवाडे, मलाजी पातेवार, विकास निरुदवार, देवीदास बोरकुटे, रुपेश वाकूडकर, प्रदीप कोरडे उपस्थित होते
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता रोशन कटलाम, अजित भोपये, अंकुश बबनवाडे, नीरज वाकूडकर, प्रज्वल परचाके, मनोज कोरडे, पवन बोबाटे, दिनेश कोरडे, महेश बोरकुटे, भास्कर बाबनवाडे यांनी परिश्रम घेतले