आशाताई बच्छाव
नाशिक शहर परिसरात काल पाच महिला व दोन पुरुष वेगवेगळ्या ठिकाणांहून बेपत्ता झाल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.
भास्कर देवरे ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बेपत्ता झाल्याचा पहिला प्रकार ओढा येथे घडला. खबर देणार भास्कर सदाशिव नेवाडे (रा. मु. पो. ओढा, ता. जि. नाशिक) यांची पत्नी रोहिणी भास्कर नेवाडे ही दि. १६ जानेवारी रोजी दुपारी १ च्या सुमारास एमएच १५ एचएफ ९५६० या क्रमांकाच्या अॅक्टिव्हा मोपेडसह घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.
बेपत्ता झाल्याचा दुसरा प्रकार अंबड परिसरात घडला. खबर देणार हंसराज महेंद्र हिरे (रा. डीजीपीनगर नंबर २, सिडको, नाशिक) यांनी दिलेल्या माहितीनुसार लता महेंद्र हिरे (वय ४८) या राहत्या घरातून कोणासही काहीही न सांगता घराबाहेर निघून गेल्या. त्यांचा परिसरात शोध घेतला; मात्र त्या मिळून आल्या नाहीत. या प्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बेपत्ता झाल्याचा तिसरा प्रकार सिडकोत घडला. खबर देणार दिनेश गणपत पवार (रा. दत्त चौक, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रेश्मा दिनेश पवार (वय २८, ही १६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बेपत्ता झाल्याचा चौथा प्रकार उपनगर येथे घडला. याबाबत सचिन रामभजन चौहान (रा. श्रीमान अपार्टमेंट, उपनगर) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार गंगुबाई रामा निंबारे (वय ७५) या काल सकाळी १० च्या सुमारास घराच्या बाहेर बसण्यासाठी जात असल्याचे सांगून गेल्या; मात्र बराच वेळ होऊनही त्या घरी आल्या नाहीत. त्या वयोवृद्ध असल्याने त्यांचा परिसरात शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. या प्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बेपत्ता झाल्याचा पाचवा प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला. खबर देणार प्रतिभा नंदू मांडगे (वय ५३, रा. प्रशांतनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांची सून धनश्री संदीप मांडगे (वय २०) ही दि. १६ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काही एक न सांगता घरातून निघून गेली आहे. तिचा परिसरात शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बेपत्ता झाल्याचा सहावा प्रकार त्रिमूर्ती चौकात घडला. खबर देणार ललिता वसंत कारले (रा. शिवशक्ती चौक, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांचा मुलगा परमेश्वर कारले (वय ३२) हा काल सकाळी साडेदहा वाजता कामावर जातो, असे सांगून घराबाहेर गेला. बराच वेळ होऊनही तो घरी आला नाही. त्याला फोन केला असता तो फोन घेत नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही. या प्रकरणी युवक बेपत्ता झाल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बेपत्ता झाल्याचा सातवा प्रकार अशोकनगर येथे घडला. खबर देणार मनीषा जगदीश खैरनार (रा. अनुराधा संकुल, अशोकनगर, सावरकरनगर, सातपूर) यांचे पती जगदीश प्रभाकर खैरनार हे दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता इगतपुरी येथे कामानिमित्त जात आहे, असे सांगून घरातून निघून गेले. ते अद्यापपावेतो घरी परतले नाहीत. या प्रकरणी हरविल्याची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.