Home नाशिक सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार? गिरीश महाजनांचं सूचक विधान

सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार? गिरीश महाजनांचं सूचक विधान

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20230117-WA0025.jpg

सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार? गिरीश महाजनांचं सूचक विधान
भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज) : महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यात नाशिक मतदारसंघ हा सर्वात चर्चेत आला आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपाने उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
” त्यांनी पाठिंबा मागितला तर, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे योग्य निर्णय घेतील. कारण, आम्हालाही जागा निवडून आणायची आहे. लवकरच यावर निर्णय होईल. तसेच, आमच्याकडे उमेदवाराची लाईनच होती. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या मनात वेगळी काहीतरी रणनिती असेल. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे,” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
“उद्या एकटे नाना पटोलेच…” भाजपा घरफोडण्याचं काम करत आहे, असं नाना पटोले म्हणाले होते. त्यावर गिरीश महाराजांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्हाला तुमचं घर संभाळता येत नाही. तुमच्या घरातील माणसं तुम्हाला संभाळत येत नाही. सर्वजण बाहेर पडत आहेत. उद्या एकटे नाना पटोलेच पक्षात शिल्लक राहतील, अशी शंका आहे. ते सुद्धा इकडे-तिकडे असताताच. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण राहिल, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. काँग्रेसचं रामभरोसे काम सुरु आहे,” असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

Previous articleदुधात भेसळ करण्यासाठीचे रसायन तिघांकडून जप्त.
Next articleराज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महिला हेल्मेट रॅली संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here