Home सोलापूर दुधात भेसळ करण्यासाठीचे रसायन तिघांकडून जप्त.

दुधात भेसळ करण्यासाठीचे रसायन तिघांकडून जप्त.

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230117-WA0026.jpg

दुधात भेसळ करण्यासाठीचे रसायन तिघांकडून जप्त.

युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल सोलापूर जिल्हा चीफ biro ज्ञानेश्वर निकम

पंढरपूर,   दुधामध्ये भेसळ करण्यासाठी बारामती येथून 14 कॅनमध्ये रसायन घेऊन जाणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी निलेश बाळासाहेब भोईटे(रा. टाकुळी, ता. पंढरपूर)या परमेश्वर सिद्धेश्वर काळे( रा फुलचिचोली ता.पंढरपुर) व गणेश हनुमंत गाडेकर (रा.गणेश नर्सरीजवळ पंढरपूर)या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार नवनाथ सावंत हे सोमवारी मध्यरात्री एक वाजता गस्त घालत असताना वाकरी गुरसाळे ब्रह्मा वळण येथील उड्डाणपूलनजीक दोन संशयित वाहने जाताना आढळून आली. सावंत यांनी तपासणी केली असता त्यापैकी एक का टाटा टेम्पोमध्ये 19 रिकामी कॅन होते तर दुसऱ्या टेम्पोमध्ये 14 कॅन मध्ये पांढऱ्या रंगाचे रसायन आढळून आले. याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदर 14 कॅनमधील रसायन हे दुधात मिसळण्यासाठी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सुमित मेहता यांच्याकडून आणले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सदर रसायनाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतली असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

Previous articleराज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन, पाठखळ चे यश.
Next articleसत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार? गिरीश महाजनांचं सूचक विधान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here