Home नांदेड राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महिला हेल्मेट रॅली संपन्न

राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महिला हेल्मेट रॅली संपन्न

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20230116-WA0061.jpg

राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महिला हेल्मेट रॅली संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
नांदेड (जिमाका)  :- राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2023 हे दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची उपस्थिती होती.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयात विविध रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिलांनी दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट वापर करावा यासाठी महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. अपघाताची संख्या कमी करण्याबाबत जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात सर्व नागरिकांनी वाहतूक नियमावलीचे पालन करुन सहकार्यातून अपघात मुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले.

ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदीर, शिवाजीनगर, राज कॉर्नर, एस.टी.वर्कशॉप, येथून आयटीआय पर्यंत होता. या रॅलीत सुमारे 150 महिलांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी सुमारे 60 महिला या पोलीस विभागातील होत्या. रॅलीच्या वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहा,मोटार वाहन निरिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. रॅलीसाठी मोटार वाहन वितरक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यांनी सहकार्य केले.

Previous articleसत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार? गिरीश महाजनांचं सूचक विधान
Next articleनागरीकांनी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here