Home नांदेड तन्जीम ए ईन्साफ च्या जिल्हाध्यक्षपदी रियाज शेख, जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनिल सोनसळे यांची...

तन्जीम ए ईन्साफ च्या जिल्हाध्यक्षपदी रियाज शेख, जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनिल सोनसळे यांची निवड महासचिवपदी हरपालसिंग गुलाटी, वलियोद्दीन फारूखी

152
0

आशाताई बच्छाव

IMG-20221204-WA0026.jpg

तन्जीम ए ईन्साफ च्या जिल्हाध्यक्षपदी रियाज शेख, जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनिल सोनसळे यांची निवड

महासचिवपदी हरपालसिंग गुलाटी, वलियोद्दीन फारूखी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफ संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी शेख रियाज चांदपाशा तर जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनिल सोनसळे यांची निवड करण्यात आली.
आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफचे प्रदेशाध्यक्ष एस.जी.शुत्तारी, महासचिव अशफाक सलामी यांच्या सूचनेनुसार माजी राष्ट्रीय सचिव फारूख अहमद, भाकपा नेते काॅ.प्रदिप नागापुरकर यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. यावेळी आमेर अरसिल, मोहम्मद कासिम, ईशान खान, अब्दुल समी यांची उपस्थिती होती. यावेळी अल्पसंख्यांक समाजात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक समस्यांवर जनजागृती करणारी, व अन्यायाविरूद्ध लढा देणारी देशपातळीवरील एकमेव संगठन ‘आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफ’ ची नांदेड जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी शेख रियाज चांदपाशा तर जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनिल सोनसळे, महासचिव वलियोद्दीन फारुखी बिलोली, हरपाल सिंग गुलाटी, जिल्हा समन्वयक इर्शाद पटेल देगलूर, जिल्हा उपाध्यक्ष शेख मलंग लोहा व म.मोईज धर्माबाद, मुख्य संघटक अब्दुल हकीम भोकर, सचिव शेख हुसेन रायवाडीकर, सहसचिव सद्दाम पटेल नरसीकर, कोषाध्यक्ष शेख आरिफ नायगाव, सह कोषाध्यक्ष हाफिज शेख असिमसाब कंधार, प्रसिध्दीप्रमुख मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सय्यद मुजीब अहमद मुदखेड, सय्यद नईम मुल्ला मुखेड, आदींची निवड करण्यात आली. याकार्यकारिणीचे मार्गदर्शक काॅ.प्रदिप नागापुरकर, काॅ. शेख गफारसाब सावरगावकर हे आहेत. आगामी काळात भारतीय संविधानानुसार देशात समता, बंधूता, सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करून अल्पसंख्याक समाजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरूध्द जन आंदोलन उभारणार असल्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने केला आहे.

Previous articleशिवाजी देशमुख बळेगावकर यांची देगलूर काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड.
Next articleद. ग. तटकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त तळे येथे परिसंवाद संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here