Home नांदेड शिवाजी देशमुख बळेगावकर यांची देगलूर काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड.

शिवाजी देशमुख बळेगावकर यांची देगलूर काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड.

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20221204-WA0033.jpg

शिवाजी देशमुख बळेगावकर यांची देगलूर काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर काँग्रेस तालुकाध्यक्षपदी माजी सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकतेच नांदेड येथे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर डीपी सावंत,अमर राजूरकर मोहन अण्णा हंबर्डे, जितेश
अंतापुरकर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर माझी जि प अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी देशमुख बळेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पक्षाच्या मागील काळात शिवाजी देशमुख साहेब यांचे फार मोठे महत्त्वाचे कार्य लक्षात घेऊन त्यांनी पक्षासाठी मोठे संघटन उभे करून पक्षाला एक संजीवनी दिली होती.पक्ष विस्तारासाठी त्यांनी केलेली कामे व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्याने देशमुख यांच्या तालुकाध्यक्ष निवडीला फार महत्व आहे.असे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.गोरगरिबाची, सर्वसामान्य जनतेची एक आपुलकीची जोडलेली नाळ, सर्वांना आपलंसं वाटणारी, गोरगरिबाच्या सुखदुःखात सदैव धावून जाणारे व देगलूर तालुक्याची एक बुलंद काँग्रेसची तोफ म्हणून त्यांची ओळख आहे. याआधीही त्यांनी पंचायत समिती सभापती पदाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळल्याने व त्यांच्या निवडीचे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल देगलूर तालुक्यातील व ग्रामीण भागातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here