Home नांदेड ग्रामसेवक संवर्गाचे एक दिवसीय असहकार धरणे आंदोलन.

ग्रामसेवक संवर्गाचे एक दिवसीय असहकार धरणे आंदोलन.

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20221128-WA0029.jpg

ग्रामसेवक संवर्गाचे एक दिवसीय असहकार धरणे आंदोलन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड येथे ग्रामसेवक संवर्गाकडून ग्रामसेवक संघटना जिल्हा शाखा नांदेड यांच्या निर्णयानुसार मुखेड तालुका अध्यक्ष कृष्णा रामदिनवार यांच्या नेतृत्वाखाली तालूका शाखा मुखेड यांनी संवर्गाच्या विविध मागण्याची पूर्तना होत नसल्यामुळे एक दिवशीय धरणे आंदोलन पंचायत समीती कार्यालय मुखेड येथे करण्यात आले ग्रामसेवक संवर्गाच्या धरणे आंदोलनास पस कार्यालयातील गटविकास अधिकारी श्री मिथुन कुमार नागमवाड सह विविध संवर्ग , लेखा संवर्ग , विस्तार आधीकारी संवर्गाचा पाठींबा देण्यात आला । अंदोलन यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक जिल्हाध्यक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे जिल्हा सचिव हनुमंत वाडेकर मानद अध्यक्ष गोविंद माचनवाड कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे सहसचिव शिवराज तांबोळी व अनिल पाटील यांनी मुखेड येथील आंदोलनास भेट दिली
ग्रामसेवक संघटनेच्या प्रमुख मागण्या त्यामध्ये
1.हंगरगा पक व दापका (गु.)या गावाची नव्याने चौकशी न करणे
2. पंचायत समिती बिलोली येथील सौ. गोदावरी सोनकांबळे ग्रामसेविका यांना न्यायालयाच्या आदेशानुसार पदस्थापना द्यावी
3. ग्रामसेवक संवर्गाच्या अडीअडचणी सोडवण्यास दिल्यामुळे
4. गटविकास अधिकारी यांना निलंबनाचे अधिकार रद्द करणे
5. अश्वशीत प्रगती योजनाची 10 20 30 लाभ देणे
6. कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करणे व त्यांचे मानधन काढणे
7. सेवा जेष्ठता यादीतील त्रुटीचे दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करणे
8. दिव्यांग जीएसटी बांधकाम नोंदणी निविदा याचे प्रशिक्षण देणे
9. बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्याचे लेखी आदेश देणे
10. आयसीआयसीआय बँकेतील होणारी गैरसोय दूर करणे
11. पुराव्या निश्चित दिलेल्या तक्रारीचे च दखल करणे
या विविध मागण्या करिता एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे
आंदोलन यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष कृष्णा रामदिनवार सचिव सतीश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सय्यद नजीर, संजय जाधव, मैफूजदिन मनियार, सिंधुताई भवर ,शुभम भांगे, संतोष घुमडे ,हनुमंत गजेले, अंतेश्वर इंगळे, गणेश देशमुख, राजू शृंगारे, माधवी देवकांबळे, राहुल वडजे, सुवर्णामाला जेठेवाड आदी ग्रामसेवक उपस्थित होते.
ग्रामसेवक संवर्गाच्या या मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाभर काम बंद आंदोलन असहकार आंदोलन व लेखणी बंद आंदोलन करण्यात येईल असे तालुकाध्यक्ष श्री कृष्णा रामदिनवार यांनी आंदोलनात सांगितले.

Previous articleशेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पाच महत्वाचे ठराव पारीत
Next articleपत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षाचा तुरुंगवास : डी. टी. आंबेगावे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here