Home माझं गाव माझं गा-हाणं वनविभाग सुस्त बिबटया मस्त, वटार परीसरात बिबट्या शेळ्यांवर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात...

वनविभाग सुस्त बिबटया मस्त, वटार परीसरात बिबट्या शेळ्यांवर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात  

124
0

राजेंद्र पाटील राऊत

वनविभाग सुस्त बिबटया मस्त, वटार परीसरात बिबट्या शेळ्यांवर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात
सटाणा नारायण भोये युवा मराठा न्युज नेटवर्क)
वटार येथिल सावतावाडी वस्तित बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकरयांच्या दुभती जनावरांवर ताव मारत आहे आज मध्य रात्री वटार शिवारातील गट नंबर २७ मधील दशरथ येसा महारणर यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला चढवत एक शेळी व कुत्रा ठार केल्याने गरीब मेंढपाळ आर्थिक अडचणीत सापडला असून जवळपास 6 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दररोजच् सायंकाळ पासुनच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतो. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी ह्या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरेहि मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व मेंढपाळ धास्तावला आहे.
” गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून 20ते 25 निष्पपाप मुक्या प्राण्यांचा जीव गेला आहे, अनेक दिवसापूर्वी सावतावाड़ शिवरात बिबट्याचा वावर आहे. वनपाल उडवा उडवीचे उत्तर देऊन वनपाल आपल्या अंगावरचे काम झटकत असतात, अस वाटतंय वनविभाग सुस्त बिबटया मस्त अस नागरिकांना वाटतंय, वनपालांच्या कृपेने परिसरात अवैद्य वृक्ष तोड होते तेव्हा वनपाल लक्ष्य घालतात, मग बिबटयाचा हल्ला होतो तेव्हा कुठे जातात  हा सवाल उपस्थित होत आहे. सावतावाड़ि परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून दोन  तीन शेतकऱ्याना मुक्त दर्शनही दिले आहे. दरववर्षि पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतो व् पाळीव प्राण्याणवर ताव मारतो. येथे लपन्यासाठी मोठी काटेरी जुड़पे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्या आपले काम फत्य करुण घेतो”.
मेंढपाळ तर दर वर्षी जेरिस आले असून दरवर्षी 10 ते 12 मेँढ़या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोड़धंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागुण काडावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत.
गेल्या तीन ते चार महिन्यात 25  पाळीव प्राण्याना आपला जिव गमवावा लागला असून,  भक्ष्याच्या शोधत बिबटया एका वृद्ध महिलेवर्ती हल्ला केला होता प्रसंगावधाने महिलेचे प्राण वाचले, वस्तीनवर मुक्त दर्शन देतो तरिपन प्रशासन काय करत आहे. असच चालत राहील तर बिबट्या लवकरच मानवी हानी होऊ शकते अस परिसरातील नागरिकांच् मत आहे.

Previous articleअक्कड बक्कड बंबे बो 80 90 पुरे 100
Next articleजगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त मौजे केरूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here