Home नांदेड पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षाचा तुरुंगवास : डी. टी. आंबेगावे

पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षाचा तुरुंगवास : डी. टी. आंबेगावे

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20221128-WA0033.jpg

पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षाचा तुरुंगवास : डी. टी. आंबेगावे

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची महाड तालुका कार्यकारिणी जाहीर.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
महाड, रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची महाड तालुका कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे व कोकण युवाध्यक्ष सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली.
महाड तालुका अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढवण, तालुका उपाध्यक्ष विशाल मोहिते, सचिव समीर पवार, खजिनदार अभिजित ढाणीपकर, संघटक राकेश देशमुख, सहसंघटक सुयोग जाधव, कार्याध्यक्ष मिलिंद पवार, सदस्य नितेश पवार, सुमेध साठे, आदेश प्रसाद, सौरभ बनकर, सचिन चांदोरकर, सतीश मेहता, निलेश शिंदे, संदेश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारांची आचारसंहिता व पत्रकारांच्या अंगी कोणते गुण असावेत? या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्याला, हिंसाचार करणाऱ्याला अथवा तशी चिथावणी देणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड अशी पत्रकार संरक्षण कायद्यात तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या एकाही पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल होऊ देणार नाही. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी संघटना अहोरात्र कार्य करीत आहे त्यामुळे पत्रकारांनी नेहमी निःपक्षपातीपणे बातमी प्रसिद्ध करावी असे प्रतिपादन केले.
यावेळी कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. महाड तालुका अध्यक्ष ॲड स्वप्नील ढवण यांनी आभार मानले.

Previous articleग्रामसेवक संवर्गाचे एक दिवसीय असहकार धरणे आंदोलन.
Next articleपत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षाचा तुरुंगवास : डी. टी. आंबेगावे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची महाड तालुका कार्यकारिणी जाहीर.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here